ट्रॅक्टरच्या चाकाखाली तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: March 13, 2017 01:01 IST2017-03-13T01:01:33+5:302017-03-13T01:01:33+5:30

मांडवे खुर्द : सहा वर्षाचा मुलगा बालंबाल बचावला

The death of the boy under the wheels of the tractor | ट्रॅक्टरच्या चाकाखाली तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टरच्या चाकाखाली तरुणाचा मृत्यू

तोंडापूर, ता.जामनेर : ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मांडवे खुर्द, ता. जामनेर येथे रविवारी दुपारी 12 वाजता घडली. या          अपघातात या तरुणासोबत असलेल्या त्याचा सहा               वर्षाचा    मुलगा मात्र बालंबाल बचावला.
मांडवे बुद्रूक तांडा येथील करतारसिंग जालमसिंग राठोड (वय 38) हा तरुण व त्याचा मुलगा       ओम हे होळीच्या सणाच्या निमित्ताने मांडवे खुर्द येथे स्वस्त धान्य     दुकानात माल घेण्यासाठी मोटारसायकल (एमएच-21-ई-6960)ने गेले होते.  दुकानदाराकडून गहू घेऊन परत येत होते. तेव्हा त्यांच्यासमोरच मुरुमाने भरलेले प्रल्हाद भिका अपार यांच्या   मालकीचे ट्रॅक्टर (एमएच 19-एपी 6941) उजवीकडे वळत होते.  मोटारसायकलस्वार मागून ओव्हरटेक करीत त्या ट्रॅक्टरवर आदळली.      त्यात करतारसिंग राठोड हा चाकाखाली आल्याने त्याचा     जागीच मृत्यू झाला, तर गव्हाची पिशवी पकडून बसलेला त्याचा     सहा वर्षाचा मुलगा ओम मात्र   बाजूला फेकला गेल्याने त्यास किरकोळ मार लागून तो थोडक्यात बचावला.
ग्रामस्थ व नातेवाइकांनी त्याला तत्काळ जामनेर ग्रामीण रुग्णालयात नेले. त्याच्या पश्चात प}ी, दोन मुले, एक मुलगी, आई, एक भाऊ असा परिवार आहे.
होळी हा बंजारा समाजाचा महत्त्वाचा सण असून, मांडवे बुद्रूक तांडय़ात मात्र या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला. सायंकाळी तांडय़ातील एकाही घरी चूल पेटली नाही.

Web Title: The death of the boy under the wheels of the tractor