खेळताना दोरीचा फास लागून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:22 IST2018-08-18T12:22:42+5:302018-08-18T12:22:56+5:30

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे घडली घटना

The death of the boy after the rope hangs while playing | खेळताना दोरीचा फास लागून मुलाचा मृत्यू

खेळताना दोरीचा फास लागून मुलाचा मृत्यू

जळगाव : चिंचेच्या झाडाजवळ खेळता खेळता अकरा वर्षीय मुलाच्या गळ्यास दोरीचा फास बसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११़३० पूर्वी भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे घडली. कृष्णा प्रकाश महाजन असे मयत मुलाचे नाव आहे़
प्रत्यक्षदर्क्षींनी दिलेल्या माहिती नुसार, कृष्णा याच्यासह काही बालके गावाबाहेर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिंचेच्या झाडाजवळ खेळत होते. या झाडाला असलेली दोरी धरून खेळण्याचा प्रयत्नात कृष्णा याच्या गळ्याला फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान गावातील मयतावर अंत्यसंस्कार करून येत असलेल्या काही नागरिकांनी सर्वप्रथम हा प्रकार बघितला. घटनेची माहिती मिळाल्यावर भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलास जिल्हा रूग्णालयात नेले़ वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती मुलास मृत घोषित केले़

Web Title: The death of the boy after the rope hangs while playing