कपिलेश्वर येथे भगताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:22 IST2019-03-06T00:22:25+5:302019-03-06T00:22:47+5:30
मारवड, ता. अमळनेर : तापी पांझरा संगमावरील कपिलेश्वर येथे महाशिवरात्रीच्या रात्री अंगात वारे आले असताना राजू जयसिंग पवार (भिल, ...

कपिलेश्वर येथे भगताचा मृत्यू
मारवड, ता. अमळनेर : तापी पांझरा संगमावरील कपिलेश्वर येथे महाशिवरात्रीच्या रात्री अंगात वारे आले असताना राजू जयसिंग पवार (भिल, वय २५) या भगताचा मृत्यू झाला.
कपिलेश्वर येथे महाशिवरात्रीला अनेक भगत घुमत असतात. अशाच प्रकारे राजू पवार यांच्या अंगात वारे आले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. राजू पवार हे होळनांथे येथील रहिवासी आहे.
दरम्यान, सोमवारीच येथे एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने आधीच यात्रेवर दु:खाचे सावट आहे. पाठोपाठ दुसऱ्या दिवशी पुन्हा एका तरुण भगताचा मृत्यू झाल्याने यात्रेत पुन्हा शोककळा पसरली. दरम्यान या दोन्ही घटनांमुळे परिसरातील गावांमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.