रावेर येथे तरुणाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:30 AM2019-01-26T00:30:49+5:302019-01-26T00:31:13+5:30

संशयास्पद मृत्यू

The dead body of a young man in Raver | रावेर येथे तरुणाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह

रावेर येथे तरुणाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह

Next

रावेर, जि. जळगाव : शहरातील बंडू चौकातील रहिवासी व स्लॅब टाकण्याचे काम करणारा शेख इम्रान शेख लुकमान (वय २४) या युवकाचा खिर्डी बुद्रूूक शिवारातील केळीबागेत अर्धनग्न अवस्थेत व कंडोम लावलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला. याप्रकरणी निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, लैंगिक संबंधादरम्यान त्याचा ह्रदयविकाराने मृत्यू आला असावा, असा अंदाज व्यक्त करून व्हिसेरा राखून ठेवल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
शेख इम्रान शेख लुकमान हा आरसीसी काँक्रिट मिक्सर भाड्याने घेऊन स्लॅब टाकण्याचा व्यवसाय करीत होता. गुरुवारी दुपारी १२ वाजता तो वाघोडला कामाचा शोध घेण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर गेला व त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दरम्यान, सकाळी खिर्डी बुद्रूक ते विवरे रस्त्यालगतच्या खिर्डी शिवारातील महेंद्र पाटील यांचे शेत गट नं ५३ मधील केळीबागेत या तरूणाचा अर्धनग्न अवस्थेत व कंडोम लावलेल्या स्थितीत संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला.
या प्रकरणी खिर्डी बुद्रूक येथील पोलीस पाटील अरूण हरी पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निंभोरा पोलीस स्टेशनचे फौजदार कोसे, पोहेकॉ मकसूद शेख, पोकॉ तडवी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविला. मयताच्या खिशातील पाकिटावरून त्याची ओळख पटली.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. त्यांनी सदर मयत हा काहीतरी उत्तेजक गोळ्या सेवन करून लैंगिक संबंध करीत असताना त्याचा रक्तदाब वाढून ह्रदयविकाराने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास निंभोरा पोलीस करीत आहेत.

Web Title: The dead body of a young man in Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव