Damage of crops on Jalgaon district over 5 lakh 5 thousand 5 hectares | जळगाव जिल्ह्यात ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
जळगाव जिल्ह्यात ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सहा लाख ३४ हजार ३६८ शेतकऱ्यांचे ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवर नुकसान झाल्याचा अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनाच्या सचिवांकडे (मदत व पुनर्वसन महसूल व वनविभाग) यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केला आहे. अतिवृष्टीत पिकांच्या व फळपिकांच्या नुकसानीचे प्रपत्र अ, ब, क, ड अन्वये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवालात म्हटले आहे.
यंदाच्या दिवाळीपूर्वी तसेच दिवाळीमध्ये व त्यानंतरही जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊन त्यात कापूस, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीनंतर पंचनाम्याचे आदेश दिल्यावरही दिवाळीच्या सुट्यांमध्ये पंचनाम्याचे काम रखडले होते. ५ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले, मात्र वेगवेगळ््या कारणांनी बुधवारी पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवाल सचिवांकडे जिल्हाधिकाºयांनी सादर केला.
कापसाला बोंड फुटल्यानंतर पाऊस आल्याने कपाशीचे बोंड अक्षरश: सडून गेली तर ज्वारी काळी पडली. तसेच मका व अन्य पिके काढून ठेवल्यानंतर अतिपावसामुळे त्यावर बुरशी आली. यामुळे कपाशीचा दर्जा खालावला आहे. सोबतच इतर पिके, चारा अतिवृष्टीने खराब झाली आहेत.

Web Title: Damage of crops on Jalgaon district over 5 lakh 5 thousand 5 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.