जळगाव : रस्त्यात लोंबकळणारी केबल दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने मनीष चंद्रकांत पांढारकर (२७, रा. वाघनगर) हा तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता मु. जे. महाविद्यालयाच्या समोर घडली. मनीष याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनीष हा बॅँकेच्या क्रेडीट कार्डचे काम करतो. शुक्रवारी काम आटोपल्यानंतर घरी जात असताना मु. जे. महाविद्यालयासमोर केबल लोंबकळत होती. अंधारामुळे केबल मनीषच्या गळ्यात अडकली, त्यामुळे तो दुचाकीवरुन कोसळला.
लोंबकळणारी केबल गळ्यात अडकून दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:47 IST