एरंडोल येथे आढळले भुयार, गावात उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 13:28 IST2018-08-25T13:26:45+5:302018-08-25T13:28:53+5:30
ओटा जमिनीत कोसळला

एरंडोल येथे आढळले भुयार, गावात उत्सुकता
एरंडोल, जि. जळगाव - ऐतिहासिक गाव म्हणून परिचित असलेल्या एरंडोल येथे शुक्रवारी रात्री राजेंद्र जयसिंग परदेशी यांच्या घरासमोर असलेल्या ओटा जमिनीत कोसळून भुयार आढळून आले. यामुळे गावात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
एरंडोल हे गाव ऐतिहासिक असून येथे पुरातन अवशेष आढळून येतात. जोशी वाडा भागात राहणारे राजेंद्र परदेशी यांचे प्रशस्त घर असून घराशेजारी एक दुकानही आहे. शुक्रवारी या दुकानासमोर असलेला ओटा जमिनीत कोसळला. शनिवारी पहाटे हा प्रकार लक्षात आला. त्या वेळी तेथे पाहणी केली असता आत भुयार असल्याचे दिसून आहे. गावात ही वार्ता पसरताच येथए बघ्यांची गर्दी झाली होती. या पूवीर्ही गावात अनेक वेळा असे भुयार आढळून आले आहे.