शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

क्रॉसमॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:18 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘रंग प्रेमाचे’ या सदरात साहित्यिक डॉ.उल्हास कडूसकर संवादातून लिहिताहेत...

प्रदीप : अहो, अहो, मिस्, अहो कशा चालल्या आहात तुम्ही रुळांच्या मधून? काय मरायचंय का तुम्हाला?शिखा : (अडखळत) का... काय? म... मरायचंय का? नाही नाही...प्रदीप : नाही ना? मग नीट चला ना? मला वाटलं की तुम्ही बहुतेक आत्महत्या करण्याच्या इराद्यानं आलाय? उडी मारणार की, काय गाडी आली म्हणजे...शिखा : छे छे! मी काही लेचीपेची नाहीये.. आत्महत्या वगैरे करणार नाही... मुळीच नाही... अजिबात नाही....प्रदीप : हो हो हो! पण एवढे चिडताय कशामुळे ?शिखा : आणि, काय हो? मला तुम्ही छेडताय.. पण तुम्ही तर मघापासून सारखे घुटमळताय- रुळाच्या आत बाहेर, आत बाहेर. माझे फक्त लक्ष नव्हते पण तुम्ही तर जाणून बुजून-प्रदीप : तुमचं लक्ष नव्हतं की, कसल्या विचारात होतात.... शिखा : हो, विचारात होते... पण तुमचं काय?प्रदीप : मी पण आत्महत्येच्या विचारात होतो.. म्हणजे आहे... मला नाही जगायचं.. पण धाडस होत नाहीये...शिखा : मी पण म्हणजे?प्रदीप : माझ्या मनात प्रचंड खळबळ चाललीय- टु बी आॅर नॉट टुबी. तुमचीही तशीच चालू आहे ना...शिखा : नाही नाही. घरी असताना एखादे वेळेस म्हणजे एकदाच विचार आला होता. पण आता नाही. आता मी फक्त आपल्याच तंद्रीत होते... निराळ्याच विचारात होते....प्रदीप : प्रेमभंगाच्या?शिखा : तुम्हाला कसं कळलं?प्रदीप : अहो इतक्या निर्जन ठिकाणी एकट्या अशा व्यग्र मनस्थितीमध्ये इथे रुळांमधून चालण्याचे दुसरे काय कारण असणार?शिखा : आणि तुम्ही- तुम्ही पण... प्रेम भंग? म्हणून आत्महत्या?प्रदीप : होऽ तसं पाहिलं तर आपण समदु:खी आहोत...शिखा : पण तुम्ही इतके हळवे कसे? माझं काय? मी एक मुलगी आहे. मी गेले तरी काही फरक पडणार नाही.. पण तुम्ही तुमच्यावर घरी कुणी अवलंबून असेल.. त्यांचं काय होईल?प्रदीप : त्याचं काय आणि कसं याचा विचार का करू? माझा प्रेमभंग नाही, दारुण विश्वासघात झाला आहे... त्याचं काय? ते मी कसं विसरू- कसं सहन करू.शिखा : पण असं झालं होतं तरी काय?प्रदीप : काही नाही, सगळं काही व्यवस्थित जुळून आले होते आणि ऐनवेळी आमच्या घरच्यांना जातीबाहेरचा मुलगा चालणार नाही म्हणून तिने कच खाल्ली... सगळं सगळं फिसकटलं!शिखा : कमाल आहे, पण हे आधी नव्हतं का कळलं?प्रदीप : कल्पना नाही, काय सांगणार? आईवडिलांना मी दुखावू शकत नाही, असे सांगून तिने काढता पाय घेतला...शिखा : आजही हे असेच चालू आहे ना? जातपात आणि काय काय?प्रदीप : पण, पण ... तुमचं तुमचं काय झालं? का ही अशीच रडकथा?शिखा : नाही. आमचंही बरेच दिवस ठीक चाललं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून अचानक त्याचा नूर बदलला, तो मला टाळायला लागला.प्रदीप : पण का? कशामुळे.शिखा : मला ते नंतर समजलं! मी हुशार म्हणून मला नावाजणारा तो आता ब्युटी अ‍ॅण्ड ब्रेन नको तर ब्युटी अ‍ॅण्ड मनी पाहिजे म्हणाला!प्रदीप : अरे अरे अरे ! म्हणजे हुंडा?शिखा : नुसता हुंडा नाही. त्याचं आता जिच्याशी लग्न ठरलं आहे तिचे वडील त्याला स्वत:ची कंपनी काढून देणार आहेत. बिल्डींग कन्स्ट्रक्शनची आता तो नोकरी करीत आहे दुसऱ्याकडे.प्रदीप : मलाही शंका येते आहे की, जातीचे कारण सांगतात, पण तिला माझ्यासारखा साधा चाकरमान्या. सॉफ्टवेअरचे काम करणारा नको होता. ती मला फक्त खेळवत होती.शिखा : आणि हा.. हा मला फिरवत होता. म्हणजे दोघांनीही आपल्याला टाईमपास म्हणून वापरलं होतं.प्रदीप : नक्की! तसंच असणार! मला तर खात्री आहे की, तिचे लफडे चालूच होते मला ठाऊक नव्हते. एकाच इमारतीत दोघांची आॅफीस.शिखा : एक्झॅक्टली मलाही याचा असाच संशय आहे. मी साधी कॉल आॅपरेटर मध्यमवर्गीय. त्याला या रश्मी- रश्मीनं होकार दिला आणि मला लगेच कटवलं. तिनंही कुणाला तर गंडवलच म्हणे..प्रदीप : रश्मी... रश्मी मराठे? मीच तो प्रदीप... मीच तो गंडवलेला.शिखा : होऽ होऽ आणि तिचं लग्न ठरलंय तो... का..प्रदीप : शेखर पाटील म्हणजे तुमचा .. प्रियकर... (दोघेही स्तब्ध)प्रदीप : (काही क्षणानंतर).. शिखा, शिखा तू शिखाच ना मला कळलं होतं हे. फोनवरून कुणाला तरी डिच केलंय ते, पण ऐक मला ब्युटी, ब्रेन, मनी काहीच नकोय. मात्र फक्त हार्ट हवंय ! तू मला हो म्हणशील का?शिखा : मला खराखुरा जोडीदार हवाय ! जीवनसाथी. प्रदीप मग करायचं का आपण आता हे क्रॉस मॅच?-डॉ.उल्हास कडूसकर, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव