शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

७ सराफ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल,१२ दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:02 IST

जळगाव : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात सोमवारपासून चौथा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ३१ मे पर्यंत अत्यावश्यक ...

जळगाव : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात सोमवारपासून चौथा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ३१ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना बंदी घालण्यात आली असताना सोमवारी शहरात अनेक व्यवसायिकांनी आपले दुकाने थाटली होती. त्यामुळे मनपा आयुक्त संतोष वाहूळे यांनी सराफ व्यावसायिकांच्या ७ दुकानांसह एकूण १२ दुकाने सील केली आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सराफ व्यवसाय करणाऱ्या ७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने, मॉल, सराफ बाजार इतर व्यावसायिकांना व्यवसाय सुरु करण्यास बंदी घातली असताना सोमवारी शहरात वेगळेच वातावरण दिसून आले.राजकमल चौकातील पाच दुकाने सीलसराफ बाजारातील दुकानांवर कारवाई केल्यानंतर राजकमल चौक परिसरातील पाच हार्डवेअर व इलेक्ट्रिक दुकानेदेखील सील करण्यात आली. इलेक्ट्रिक दुकानांवर सोशल डिस्टन्सिंगचेही पालन न केल्याने संबधित दुकानदारांना प्रत्येकी ५०० रुपयांचाही दंड ठोठावण्यात आला. तसेच या ठिकाणी उपस्थित ग्राहकांनी तोंडावर मास्क न लावल्याने सात जणांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, मनपाने सील केलेल्या १२ दुकानदारांना नोटीस बजावून, त्यांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच दुकाने पुन्हा उघडण्याबाबतचा विचार केला जाणार आहे.मनपाचे पथक पोहचल्यानंतर गोंधळमनपाचे पथक सुभाष चौक भागात आल्यानंतर अनधिकृत भाजीपाला विक्रेते, हातगाडी चालकांची कारवाईच्या भितीने एकच पळापळ सुरु झाली. त्यामुळे काही काळ या भागात प्रचंड गोंधळ उडाला. उपायुक्त वाहुळे यांनी सराफ बाजारात पोहचल्यानंतर उघडलेल्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मनपाच्या पथकाने दुकाने सील करण्याची प्रक्रिया सुरु केली. काही विक्रेत्यांनी मनपा अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून कारवाई न करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाºयांचे आदेश नसताना दुकाने सुरु केल्याने सराफ बाजारातील सात दुकाने सील करण्यात आली.या दुकानांवर करण्यात आली कारवाईनिर्मल ज्वेलर्स, डी.एस.प्लाझा ज्वेलर्स, सीसीटीव्ही शॉप, आरती ज्वेलर्स, नंदुरबारकर ज्वेलर्स, बाविस्कर ज्वेलर्स, भरत हार्डवेअर, कन्हैया अगरबत्ती, उध्दव ट्रेडर्स, एचटी सिक्कोर ही सात दुकाने सील करण्यात आली. सात सराफ व्यावसायिकांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव