राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांच्याविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 16:22 IST2018-06-21T16:22:17+5:302018-06-21T16:22:17+5:30
सोशल मिडीयावर कटकारस्थान करीत बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील व माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांच्याविरुद्ध भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांच्याविरूद्ध गुन्हा
अमळनेर- सोशल मिडीयावर कटकारस्थान करीत बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील व माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांच्याविरुद्ध भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला.
उदय वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १८ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक हे माझ्याविरूद्ध मुलाखत देताना प्रसार माध्यमावर दिसून आले. त्यात त्यांनी माझ्यावर १० लाख रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप करीत बदनामी केली. ही बनावट चित्रफीत माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी कटकारस्थान करून व्हायरल केल्याचे समजून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील यांनी बदनामी करीत वृत्तपत्रात खोट्या बातम्या पसरविल्या. लालचंद सैनानी यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केल्यामुळे त्यांनी हे कृत्य केले. पोलिसांची व आपली प्रतिमा मालिन करण्याचा हा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.