शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

कोरोनामुळे चालक मालक विद्यार्थी वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:08 IST

जळगाव : कोरोनाच्या महामारीमुळे आपल्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य चालक मालक ...

जळगाव : कोरोनाच्या महामारीमुळे आपल्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.या मागणीसाठी राज्यभर सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र जळगावात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.कोविडच्या महामारीमुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यातील सर्व स्कूल बस विद्यार्थी वाहतूक चालक मालक यांचे उपासमारीच्या संकटाने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे हैराण झालेल्या संघटनेने शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. आजपर्यंत आर्थिक सहाय्य करण्याचे गरजेचे असताना शासनाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचे संघटनेने म्हटले आहे.मार्च महिन्यापासून स्कूल बसेस इतर वाहने बंद असून स्कूल बस सुरु होईपर्यंत दरमहा १० हजार रुपये अनुदान मिळावे, आरटीओ टॅक्स, विमा, प्रोफेशनल कर, फिटनेस व पासिंग १ वर्षासाठी माफ करण्यात यावे, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ मिळावी व त्यावरील व्याज माफ करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.यावेळी आमदार सुरेश भोळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, प्रल्हाद सोनवणे, शालेय विद्यार्थी वाहतूक संघटना अध्यक्ष बापू कुमावत, श्रमजीवी कामगार रिक्षाचालक फेडरेशन प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद तिवारी, नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन उपाध्यक्ष प्रमोद वाणी, स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष भरत वाघ, शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेचे संजय पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव