कोरोना पन्नाशीच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:52 AM2020-08-19T11:52:33+5:302020-08-19T11:52:43+5:30

शहराला दिलासा : ४९ नवे रुग्ण, १०७ रुग्ण कोरोनामुक्त

Corona below fifty | कोरोना पन्नाशीच्या खाली

कोरोना पन्नाशीच्या खाली

Next

जळगाव : मंगळवारचा कोराना अहवाल शहरासाठी काहीसा दिलासादायक ठरला़ अनेक दिवासंपासून शंभर किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळत असताना मंगळवारी शहरात ४९ नवे बाधित समोर आले आहेत़ दुसरीकडे मंगळवारीच १०७ रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे़ दोन दिवसात दीडशे रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. नव्या रुग्णांपेक्षा दुपटीने बरे होणाऱ्याचंी ही संख्या दिलासादायक आहे़
हॉकर्स, दुकानदारांची कोरोना तपासणी मोहीम
शहरातील हॉकर्स, भाजीपाला, फळ विक्रेत, किराणा दुकानदार यांची कोरोना तपासणी मोहीम १८ आॅगस्ट ते ३० आॅगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे़ बुधवारी सकाळी दहा वाजेपासून स्व़ रामलालजी चौबे शाळेत अ‍ॅन्टीजनद्वारे ही तपासणी होणार आहे़ यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय टीमने तयारी केलेली आहे़ हॉकर्स संघटनेकडून याद्या प्राप्त करून त्याद्वारे सर्वांना बोलविण्यात येणार आहे़ साडे तीन हजारांपेक्षा अधिक विक्रेत्यांची ही तपासणी मोहीम असेल, अशी माहिती आहे़
विक्रेत्यांच्या तपासणीची महापौर भारती सोनवणे यांनी मागणी केली होती़ त्यानुसार ही तपासणी होणार असून सर्व विक्रेत्यांची तपासणी केली जाईल.

मेहरूणमध्येही चाचणी
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने त्यांच्या विविध रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणीला सुरूवात केली असून आता मेहरूण येथील मुल तानी रुग्णालयातही कोरोना चाचणी केली जाणार आहे़ फिव्हर क्लिनीक येथून पाठविलेले रुग्ण, गर्भवती महिला, अन्य व्याधी असलेल्या रुग्णांची या ठिकाणी तपासणी होणार आहे़

पोलीस लाईनमध्ये संसर्ग कायम
पोलीस लाईन ४, खोटे नगर ४, पिंप्राळा ४, टी़ एम़ नगर ४, रामेश्वर कॉलनी ३, रिंगरोड ३, निवृत्तीनगर ३, रामानंद नगर २, गणेश कॉलनी २, प्रभुदेसाई कॉलनी , आकाशवाणी, शिवदत्ता कॉलनी, कासमवाडी, मोहनटाकी मागे, आनंद नगर, शाहूनगर, के़ सी़ पार्क, निसर्ग कॉलनी, शिवकॉलनी, आऱ एम़ कॉलनी, संभाजीनगर, भवानीपेठ, आयोध्यानगर, सरस्वतीनगर, प्रेमनगर, नागेश्वर कॉलनी, पंचमुखी हनुमान १, मोहाडी रोड, बहिणाबाईनगर, कांचननगर, आदर्श नगर, स्टेट बॅक कॉलनी, वाघनगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण

Web Title: Corona below fifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.