जळगावातील मानव सेवा विद्यालयात दीक्षांत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 18:10 IST2018-03-26T18:10:39+5:302018-03-26T18:10:39+5:30

मानव सेवा विद्यालयात पूर्व विभागाचा दीक्षांत सोहळा उत्साहात झाला.

Convocation ceremony in manav seva School in Jalgaon | जळगावातील मानव सेवा विद्यालयात दीक्षांत सोहळा

जळगावातील मानव सेवा विद्यालयात दीक्षांत सोहळा

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात ‘बालोपासना’ केली सादरवेल-कम गीताने नृत्याद्वारे मान्यवरांचे झाले स्वागतकुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२६ - मानव सेवा विद्यालयात पूर्व विभागाचा दीक्षांत सोहळा उत्साहात झाला.
प्रमुख अतिथी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, नगरसेवक अमर जैन, संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.एस.डाकलिया, उपाध्यक्ष डॉ.सुरेश कावडिया, सचिव विश्वनाथ जोशी, सहसचिव राजकुमार सेठिया, कोषाध्यक्ष घेवरचंद राका, सदस्य डॉ.कोमलकुमार डाकलिया, दयानंद केसवाणी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबडकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, शिशू मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
इयत्ता दुसरीतील कार्तिक भारत चौधरी या विद्यार्थ्याने गणपती स्त्रोत्र सादर केले. तसेच शिशुवर्गातील विद्यार्थी यज्ञिका देशमुख, हर्षदा पाटील, सिद्धी कापडे, खुशी जाधव या विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात ‘बालोपासना’ सादर केली. नर्सरीतील विद्यार्थ्यांनी वेल-कम गीताने नृत्याद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात नाट्यछटा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी रेखाटलेले चित्र प्रा.पी.पी.पाटील, सुरेशदादा जैन यांना प्रदान करण्यात आले.

Web Title: Convocation ceremony in manav seva School in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.