दुचाकीचा कट लागल्याने वाद; मारहाणीत तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 13:47 IST2024-11-03T13:47:11+5:302024-11-03T13:47:55+5:30
दोन गटात अमळगाव - जळोद रस्त्यावर हाणामारी झाली. यात विकास याचा मृत्यू झाला.

दुचाकीचा कट लागल्याने वाद; मारहाणीत तरुणाचा मृत्यू
चंद्रकांत पाटील / अमळनेर (जि.जळगाव) : दुचाकीला कट लागल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. ही घटना जळोद- अमळगाव ता. अमळनेर शिवारात रविवार ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली.
विकास प्रवीण पाटील (३०, रा. अमलेश्वर नगर, अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. मोटरसायकलला कट मारल्यावरून इंडिकेटर तुटले. त्यावरून दोन गटात अमळगाव - जळोद रस्त्यावर हाणामारी झाली. यात विकास याचा मृत्यू झाला.
एलसीबी पथकाने अवघ्या सहा तासात जामनेर परिसरातून संशयित नितीन पवार , अमोल कोळी , हर्षल गुरव यांना ताब्यात घेतले आहे.