शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

ठेकेदाराकडून चोपडा नपाच्या अपंग कर्मचाऱ्यास धमकी, कर्मचाऱ्यांनी केले काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:46 PM

आंदोलन

चोपडा, जि. जळगाव : येथील नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अपंग कर्मचारी यु.बी. खेवलकर यांना ४ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता कार्यालयात येऊन विनाकारण ठेकेदार सुनील उखाराम दहीवेलकर यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याचा प्रकार घडला. यामुळे ५ रोजी सकाळी १०.०० वाजता सर्व कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या वेळी प्रशासकीय इमारतीसमोर सदर ठेकेदारविरोधात घोषणाबाजी केली.सर्व कर्मचाºयांनी जळगाव जिल्हा नगरपालिका मजदूर संघ शाखा चोपडा मार्फत आंदोलन केले. तसेच संघातर्फे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात ठेकेदार सुनील दहीवेलकर यांनी सरकारी कामात अडथळा आणून दमबाजी केली म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन करणार असल्याचे नमूद केले आहे.निवेदनावर मजदूर संघाचे अध्यक्ष दीपक घोगरे, सरचिटणीस यु.बी. खेवलकर यांच्या स्वाक्षरी आहेत. कामबंद आंदोलनात पालिकेतील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, नगराध्यक्षा, तहसीलदार, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मजदूर संघाचे जिल्हाध्यक्षांंना पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव