जळगावात पारदर्शक कामकाजाची शपथ घेत काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 19:50 IST2018-07-18T19:45:49+5:302018-07-18T19:50:49+5:30
मनपा निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. नगरसेवक म्हणून विजयी झाल्यास पारदर्शक काम करेल अशी शपथ घेत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला.

जळगावात पारदर्शक कामकाजाची शपथ घेत काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. नगरसेवक म्हणून विजयी झाल्यास पारदर्शक काम करेल अशी शपथ घेत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला.
पक्षातर्फे मंगळवारी दुपारी ३ वाजता प्रचाराला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे व कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी काँग्रेस भवनात सर्व उमेदवारांना स्वच्छ व पारदर्शक कामकाजाची शपथ दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, प्रदेश सचिव डी.जी. पाटील उपस्थित होते.
काँग्रेस भवनात झालेल्या या कार्यक्रमात उमेदवारांनी महापालिकेतील कोणत्याही कामाचे टेंडर घेणार नाही. नातेवाईकाला नोकरीला लावणार नाही, कोणत्याही संस्थेच्या नावाने खुला भुखंड मागणार नाही, भ्रष्टाचाराला साथ देणार नाही तसेच जळगावकरांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहिल अशी शपथ उमेदवारांनी दिली.