वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांची आडगाव येथे सांत्वनपर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 00:47 IST2020-10-20T00:46:48+5:302020-10-20T00:47:14+5:30
आडगाव येथे वीज कोसळून मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी सोमवारी भेट देवून सांत्वन केले.

वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांची आडगाव येथे सांत्वनपर भेट
एरंडोल : तालुक्यातील आडगाव येथे वीज कोसळून मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी सोमवारी भेट देवून सांत्वन केले.
शनिवारी वीज पडून ठार झालेले रवींद्र प्रभाकर महाजन (वय २२) व महेंद्र उखर्डू पाटील (वय २३) या मृत तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. दोन्ही कुटुंबियांना योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्याचे दोघा नेत्यांनी आश्वासित केले
यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष हिंमतराव पाटील, महानंदा पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पंचायत समितीचे सभापती अनिल महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक किशोर निंबाळकर, आडगाव शहरप्रमुख रावसाहेब पाटील, उपसरपंच रवींद्र पवार, उत्तम पाटील, धीरज पाटील, जगदीश पाटील, श्याम कानडे, नाना महाजन आदी उपस्थित होते