जनता कर्फ्युचा गैरफायदा घेऊन कंपनीतून लांबविले संगणक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 09:09 PM2020-03-25T21:09:13+5:302020-03-25T21:09:24+5:30

दोघांच्या मुसक्या आवळल्या : चार दिवसानंतर गुन्हा उघड

 The computer has been removed from the company by taking advantage of public curfew | जनता कर्फ्युचा गैरफायदा घेऊन कंपनीतून लांबविले संगणक

जनता कर्फ्युचा गैरफायदा घेऊन कंपनीतून लांबविले संगणक

Next

जळगाव : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधनांनी रविवारी जनता कर्फ्यू लागू करुन त्या दिवशी जनतेने घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी एमआयडीसीतील मोरया ग्लोबल लि.या कंपनीच्या कार्यालयाच्या कुलुप तोडून १ लाख १८ हजार रुपये किमतीचे चार संगणक, प्रिंटर व सीपीयु चोरुन नेल्याचा प्रकार उघड झाला. दरम्यान, चार दिवसानंतर बुधवारी पोलिसांनी हा गुन्हा उघड केला असून सागर देवचंद महाजन (१९,रा. रामेश्वर कॉलनी) व मनोज आधार सोनवणे (१९,रा.आसोदा रोड, के.सी. नगर, जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून चारही संगणक व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यामुळे शनिवारी रात्रीपासूनच एमआयडीसीतील सेक्टर नंबर डी. १०४ व डी.१०५ मध्ये असलेली मोरया ग्लोबल लि. कंपनी बंद करण्यात आली होती. २३ रोजी कंपनी उघडली असता कार्यालयाचे कुलुप तुटलेले होते तर संगणक, प्रिंटर्स, सीपीयु चोरी झाल्याचे उघड झाले होता. त्यामुळे कंपनीतील पुरुषोत्तम बद्रीनाथ पाटील (४७, रा. सदगुरु नगर, अयोध्या नगर) यांनी तक्रार दिल्यावरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस अमोल मोरे, अतुल वंजारी,आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत, गोविंदा पाटील, इम्रान सैय्य्द, असीम तडवी, सचिन पाटील य योगेश बारी यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता ही चोरी सागर देवचंद महाजन व मनोज आधार सोनवणे या दोघांची केल्याचे उघड झाले. पथकाने बुधवारी दोघांना त्यांच्या घरातून साहित्यासह ताब्यात घेतले.

Web Title:  The computer has been removed from the company by taking advantage of public curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.