शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अजिंठा लेणी परिसरात राबविले स्वच्छता शिबिर

By admin | Updated: January 17, 2017 23:46 IST

जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाची भेट : उपक्रमाचे पर्यटकांकडून कौतुक

फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या  जतन, संवर्धन व प्रचार प्रसारासाठी जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाने आज (१७) रोजी अजिंठा लेणी- फर्दापूर टि.पॉर्इंट येथील अजिंठा लेणी अभ्यागत केंद्रास भेट देऊन तेथे शालेय विद्यार्थ्यांसोबत एक दिवसीय स्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराकरिता वाकोद (ता.जामनेर) येथील राणीदानजी जैन व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड केली होती. जपानच्या  शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना सांगितले की सन-१९८३ मध्ये भारतामधील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला जागतिक वारसा म्हणून पहिल्यांदा घोषित करण्यात आले होते. जगातील दोन जागतिक वारसा असलेले पर्यटनस्थळे आज ही स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाची असून स्वच्छता नसल्याने पर्यटकांना त्रास होऊ नये, त्यामुळे ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आम्ही अजिंठा लेणी परिसरात काही उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत ‘‘अजंता मेघा क्लिन अप’’ या उपक्रमातून आमच्या या स्वच्छता मिशनमध्ये अजिंठा लेणी परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला. भारत सरकार आणि जपानच्यासंयुक्त विद्यमानाने  दर महिन्यातून एकदा या परिसरात  स्वच्छता कॅम्पेन राबविण्यात येत आहे. जपानच्या  पथकात योशियो यामाशिता, हिराई सान यांचा समावेश होता. यावेळी महाराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, डी.एस.दानवे, अनसहेब माने, योगेश राणे, तुषार तिंगोटे, अण्णासाहेब शिंदे, प्रशांत सवई, माया नरसापूर, चंद्रशेखर  राठोड, पर्यवेक्षक पी. एस. पाटील, प्रा.नितीन पाटील, मंगेश बी. लोखंडे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे चार गटात विभागणी करून एक गट अजिंठा लेणीमध्ये तर उर्वरीत तीन गट अजिंठा विजिटिंग सेंटर तसेच टी पॉर्इंट परिसर अशी विभागाणी करून परिसरातील सर्व कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.                           (वार्ताहर)प्लॅस्टिक बैगा वापरू नका, यावर सांगितले गेले की प्लास्टिकविषयी ‘‘रिफ्यूज रिज्युज रियुज आणि रिसाइकल’’ याचा अर्थ प्लास्टिकचा नकार करा, वापर कमी करा, पुन: वापरा शेवटी भंगारवाल्याला द्या, अशी चतुसूत्र सांगत येथील मेघा क्लीन आप कैम्पेनचा शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला.