शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चोसाका एकरकमी कर्जफेड करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST

सायंकाळी सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात असलेल्या चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी ...

सायंकाळी सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात असलेल्या चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी व्हाईस चेअरमन शशी देवरे, संचालक तथा जिल्हा परिषद माजी सदस्य आनंदराव रायसिंग, नीलेश पाटील, सुनील महाजन, प्रदीप पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक अकबर पिंजारी हे उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना देवरे म्हणाले, बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे चेअरमन राधेश्याम चांडक हे १५ रोजी दुपारी ३ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या सभागृहात आले असता त्यांनी एक रकमी २७ कोटी रुपये कर्जापोटी द्यावेत त्यास संमती दर्शवली व होकार दिला म्हणून राधेश्याम चांडक यांचा सर्वपक्षीय नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, भाजपाचे घनश्याम अग्रवाल, बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे अनंत देशपांडे, विभागीय अधिकारी रमेश पवार, विशाल तोतला, चोसाकाचे माजी चेअरमन ॲड. घनश्‍याम पाटील, पीपल बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, उद्योजक सुनील जैन, विजय पाटील, संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत चेअरमन अतुल ठाकरे यांनी सर्व संचालकतर्फे राधेश्याम चांडक यांचा सत्कार केला. त्यामुळे यापुढे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. पुढील प्रक्रियेत जो कोणीही कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेईल त्यांना एकरकमी २७ कोटी रुपये बुलढाणा अर्बन पतसंस्थेस देणे भाग असेल, असेही पत्रकार परिषदेत अतुल ठाकरे यांनी सांगितले. पुणे येथील सहकार आयुक्तालयामार्फत चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या भाडेतत्त्वावर देण्यासाठी ई-टेंडरिंग होईल. त्यानुसार पुढची प्रक्रिया संपन्न होईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.