आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:51 IST2018-09-27T22:50:07+5:302018-09-27T22:51:27+5:30
अमळनेर तालुक्यातील बोहरे येथील कांतीलाल सुकदेव पाटील (६५) या वृद्धाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना २७ रोजीच्या रात्री घडली.

आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
अमळनेर : तालुक्यातील बोहरे येथील कांतीलाल सुकदेव पाटील (६५) या वृद्धाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना २७ रोजीच्या रात्री घडली. सदर वृद्धाचा मृतदेह सकाळी अमळनेर शहरात २७ रोजी तहसील कचेरी आवारातील सेतू केंद्राच्या ओट्यावर आढळून आला. यावेळी त्यांच्या खिश्यात आढळलेल्या चिठ्ठीवरून त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा खुलासा झाला.
२७ रोजी सकाळी त्यांचा मृतदेह सेतू केंद्राच्या ओट्यावर आढळला. यावेळी पोलिसांना पाचारण केल्यानंतर त्यांच्या खिशात असलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटली. खिशात तंबाखूच्या पुडीत थायमेंट व सोबत पेनाने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. यात मी आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले होते.