महापारेषणच्या जळगाव जिल्ह्यातील चार प्रस्तावित उपकेंद्रांचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ई-भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 20:27 IST2018-03-28T20:27:51+5:302018-03-28T20:27:51+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जिल्ह्यातील प्रस्तावित चार उपकेंद्रांचे ई-भुमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता.30) सकाळी साडेदहा वाजता 660 मेगावॅट महानिर्मिती प्रकल्प, दीपनगर, भुसावळ येथे होणार आहे.

महापारेषणच्या जळगाव जिल्ह्यातील चार प्रस्तावित उपकेंद्रांचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ई-भूमिपूजन
जळगाव - महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जिल्ह्यातील प्रस्तावित चार उपकेंद्रांचे ई-भुमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता.30) सकाळी साडेदहा वाजता 660 मेगावॅट महानिर्मिती प्रकल्प, दीपनगर, भुसावळ येथे होणार आहे.
यामध्ये जामनेर तालुक्यातील 220 के.व्ही.उपकेंद्र, केकतनिंभोरा, यावल तालुक्यातील 220 के.व्ही.उपकेंद्र विरोदा, भडगाव तालुक्यातील 132 के.व्ही.उपकेंद्र कोठली, मुक्ताईनगर तालुक्यातील 132 के.व्ही.उपकेंद्र कर्की (पुर्नाड) या प्रस्तावित उपकेंद्रांचा समावेश आहे. या उपकेंद्रांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विशेष अतिथी म्हणून कृषी, फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा पर्यटन, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वलाताई पाटील उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार ए. टी. (नाना) पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री. डॉ. सुधीर तांबे, डॉ. अपूर्व हिरे, श्रीमती स्मिताताई वाघ, श्री. चंदुभाई पटेल, एकनाथराव खडसे, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीषदादा चौधरी, उन्मेष पाटील, किशोर पाटील उपस्थित राहणार आहे. तर कार्यक्रमासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) श्री. अरविंद सिंह, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार मित्तल, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, रवींद्र चव्हाण, संचालक (प्रकल्प, महापारेषण) उपस्थित राहणार आहेत.