शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी विमानातून आणल्या फाईल्स

By admin | Updated: July 18, 2014 12:59 IST

दौर्‍यामुळे कामे प्रलंबित राहू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी विमानात त्यांच्यासोबत काही महत्त्वाच्या फाईल्स आणल्या होत्या. जळगाव ते फैजपूर या प्रवासादरम्यान त्यांनी त्या मार्गी लावल्या.

कर्तव्याची जाणीव : जळगाव ते फैजपूर प्रवासादरम्यान केले कामकाज
 
जळगाव : दौर्‍यामुळे कामे प्रलंबित राहू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी विमानात त्यांच्यासोबत काही महत्त्वाच्या फाईल्स आणल्या होत्या. जळगाव ते फैजपूर या प्रवासादरम्यान त्यांनी त्या मार्गी लावल्या. दरम्यान, विमानतळावर स्वीय सहायक दुसर्‍या चारचाकीत असल्याने ते फायली घेऊन येईपर्यंत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जवळपास पाच मिनिटे विमानतळावर थांबले. यामुळे त्यांचा ताफाही पुढे सरकला नाही. 
सकाळी ९.३0 वाजता मुख्यमंत्र्यांचे कुसुंबा येथे विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. 
स्वागत कार्यक्रमानंतर काही वेळ चव्हाण व इतर मंडळी विमानतळावरील विशेष दालनामध्ये बसली. त्यात काँग्रेसच्या मोजक्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेता आली. 
थोडा वेळ या दालनात थांबल्यानंतर मुख्यमंत्री फैजपूरकडे जाण्यासाठी निघाले. वाहनांमध्ये सर्व मंडळी बसली. यातच मुख्यमंत्र्यांनी फैजपूर किती कि.मी. आहे? याची विचारणा केली. त्यांना ६0 कि.मी. असल्याचे सांगण्यात आले. तेवढय़ात त्यांनी निकाली काढण्याच्या फायलींसाठी स्वीय सहायकांची विचारणा केली. मुंबईहून त्यांनी या फायली विमानात सोबत आणल्या होत्या. पण स्वीय सहायक हे ताफ्यात मध्यभागी असलेल्या चारचाकीमध्ये होते. त्यांना बोलावले. त्यांच्याकडून फायली मागून घेतल्या व त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाहनामध्येच कामकाज सुरू केले.
प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्र्यांना प्रशासनातर्फे मानवंदना देण्यात येते. ही मानवंदना घेण्याचा मान चव्हाण यांनी माजी केंद्रीय मंत्री शिंदेंना दिला, पण शिंदे यांनी बाबा, तुम्ही मानवंदना घ्या, असे म्हणत नम्रपणे मानवंदना घेण्यास नकार दिला. दरम्यान, विमानतळावर पालकमंत्री संजय सावकारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड.संदीप पाटील, सहप्रभारी रमेश श्रीखंडे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी, राजस कोतवाल आदींनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसाठी दुपारी ताटकळले
मुख्यमंत्री फैजपूर येथून आपला कार्यक्रम आटोपून कुसुंबा विमानतळावर येतील व त्यांची भेट घेऊ यासाठी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी गुरुवारी दुपारी त्यांची प्रतीक्षा करीत होते. परंतु मुख्यमंत्र्यांचे वाहन थेट विमानतळावर पोहचले. तेथून ते लागलीच विमानात बसले व निघून गेले. त्यांना विमानतळावर भेटता येईल यासाठी अनेक पदाधिकारी प्रयत्न करीत होते, परंतु पोलिसांनी नकार दिला. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष डॉ.ए.जी.भंगाळे, ज्योत्स्ना विसपुते, अरुण चांगरे हे कसेबसे विमानतळाकडे पोहचले. मुख्यमंत्री विमानात बसल्याने ते भेटले नाही.
 
काही कार्यकर्ते नाराज
 
मुख्यमंत्र्यांना विमानतळावरील दालनात भेटण्यास जाणार्‍या व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने पासचे वाटप केले होते.युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे पास नसल्याने त्यांना त्या दालनामध्ये जाण्यास मज्जाव केला.वासुदेव महाजन,संजय वराडे यांनी नाराजी व्यक्त केली.महाजन यांनी तर सहप्रभारी श्रीखंडे यांच्याकडेही नाराजी व्यक्त केली. श्रीखंडे यांनी महाजन व कार्यकर्त्यांची समजूत काढली.मुख्यमंत्री फैजपूरकडे जाण्यासाठी दालनातून बाहेर आल्यानंतर या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली.