शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळकोठा गोळीबारप्रकरणी मुख्य सूत्रधारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 22:06 IST

पिंपळकोठा येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर संजय पाटील (रा.अमळनेर) यास पारोळा पोलिसांनी कन्नड, जि.औरंगाबाद येथून शुक्रवारी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देपारोळा पोलिसांनी कन्नड येथे संशयित आरोपीस घेतले ताब्यातआरोपींकडून गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील पिंपळकोठा येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर संजय पाटील (रा.अमळनेर) यास पारोळा पोलिसांनी कन्नड, जि.औरंगाबाद येथून शुक्रवारी ताब्यात घेतले.पिंपळकोठा येथे पिलुकदेव महाराज यात्रेदरम्यान पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात आरोपी सागर संजय पाटील रा.अमळनेर व सोबतच्या चार आरोपींनी भांडण सोडविण्यास गेलेले चेनेश्वर पाटील यांच्या पोटात गावठी कट्ट्याने फायर करून गंभीर जखमी केले होते. यानंतर आरोपी चोरीच्या मोटारसायकलवर पसार झाले होते. म्हणून त्यांच्याविरूद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील बाळा उर्फ तुषार प्रदीप पाटील (रा.नवलनगर, ता.धुळे) यास धुळे येथून तसेच अल्पवयीन आरोपी यास शिर्डी येथे जाऊन सावळी फाटा भागातून ताब्यात घेतले होते.दरम्यान, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे व पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध तपास पथकातील कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सागर संजय पाटील रा.अमळनेर हा औरंगाबाद ते चाळीसगावकडे येणार आहे. यानुसार पारोळा पोलिसांच्या तपास पथकाने कन्नड (जि.औरंगाबाद) येथील बसस्टॉप जवळ ६ रोजी सापळा रचून सागर पाटील यास शिताफीने पकडले.ही कारवाई पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, पोहेकाँ रवींद्र रावते, पोकाँ पंकज राठोड, सुनील साळुंखे, किशोर भोई, राहुल कोळी यांनी केली आहे. या गुन्ह्यातील पाचही आरोपी यांना पकडण्यास पोलीसांना यश आले असून, इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सागर संजय पाटील, जगदीश अभय उधेवाल, तुषार प्रदीप कदम, गौरव विजय पाटील आणि एक अल्पवयीन अशा पाच जणांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. यातील गौरव विजय पाटील हा अमळनेर पोलिसांच्या ताब्यात आहे, तर उर्वरित चार आरोपींना पारोळा पोलिसांनी अटक केली आहे.आरोपींकडून गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींनी अमळनेर पोलीस ठाण्यांतर्गत दोन मोटारसायकल चोरी व जानवे येथील गावठी कट्टा दाखवून रस्तालूट केल्याचे गुन्हे केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीParolaपारोळा