बोरनार येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 20:21 IST2020-12-17T20:21:15+5:302020-12-17T20:21:30+5:30
जळगाव : तालुक्यातील बोरनार येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ११५ची आकस्मित तपासणी केली असता तेथे काही त्रुटी आढळून आल्या ...

बोरनार येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित
जळगाव : तालुक्यातील बोरनार येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ११५ची आकस्मित तपासणी केली असता तेथे काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे या दुकानाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी काढले आहे.
पुरवठा निरीक्षकांनी तालुक्यातील बोरनार येथील स्वस्त धान्य दुकानदार सुशीला देवीदास चौधरी यांच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक ११५ची तपासणी केली होती. तपासणीच्या वेळी पुरवठा निरीक्षकांना काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे सुशीला चौधरी यांना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी नोटीस बजावली होती. नंतर खुलासा सादर करण्याचे सांगितले होते. मात्र, चौधरी यांच्याकडून खुलासा सादर करण्यात आला नाही. हे स्वस्त धान्य दुकान नजीकच्या स्वस्त धान्य दुकानात जोडण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत.