विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

By सागर दुबे | Published: May 13, 2023 11:34 PM2023-05-13T23:34:14+5:302023-05-13T23:34:28+5:30

आता २५ मे पासून परीक्षा

Changes in the Schedule of Law Course Examinations | विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

googlenewsNext

सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक/लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या परीक्षा २२ मे ऐवजी २५ मे पासून सुरु होतील.  

 विद्यार्थी व महाविद्यालयांकडून करण्यात आलेल्या मागणी नुसार विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार विधी विद्याशाखेच्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ मे ते २ जून या कालावधीत होणार आहेत. तसेच बी.ए. एल.एल.बी. सेमीस्टर ३,४,७, ८, ९, १० व एल.एल.बी. सेमीस्टर ३, ४, ५, ६ या सर्व वर्गांच्या  लेखी परिक्षा १० जून पासून सुरु होतील. विधी पदविका अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा १२ जून पासून सुरु होतील. एल.एल.एम. या पदव्युत्तर वर्गाच्या लेखी परीक्षा १७ जून पासून सुरु होतील. बी.ए.एल.एल.बी.च्या सेमीस्टर १, २, ५, ६ व एल.एल.बी.च्या सेमीस्टर १ व २ या सर्व वर्गांच्या लेखी परीक्षा ३ जुलै पासून सुरु होतील. परीक्षेतील तारखा बदल संदर्भातील परीपत्रक विद्यापीठाशी संलग्नित सर्व विधी महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. तसेच विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या तारखांतील बदलाची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल यांनी केले आहे.

Web Title: Changes in the Schedule of Law Course Examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव