शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

देशाच्या शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल आवश्यक : अविनाश धर्माधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:25 PM

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्ह्यातील वरणगावच्या अनिकेतचा आदर्श घ्यावा

ठळक मुद्देयशासाठी हवी समर्पण व चिकाटीराज्यातून यशस्वी झालेले प्रशासकीय अधिकारी उत्तम कारभार हाताळताहेतशासकीय किंवा खाजगी शाळांची तुलना केली तर खाजगी शाळांची गुणवत्ता अधिक

किशोरपाटील/आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : देशातील तळागाळातील समाजाचा विकास करायचा असेल तर प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता उंचावली पाहिजे. खाजगी शाळांच्या गुणवत्तेप्रमाणे सरकारी शाळांचीही स्थिती सुधारायला हवी. त्यासाठी देशाच्या शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल आवश्यक आहेत, असे मत भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी सनदी अधिकारी व पुणे येथील चाणक्य मंडळाचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.एसडी सीडतर्फे आयोजित शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यासाठी ते जळगावात आले होते. त्याप्रसंगी त्यांच्याशी झालेला संवाद असा...प्रश्न - देशाच्या व राज्याच्या शिक्षण पध्दतीत तुम्हाला काही बदल अपेक्षित वाटतात?धर्माधिकारी- भारताच्या शिक्षण पध्दतीत काळानुरुप काही बदल होताहेत मात्र काळाचे आव्हान पेलेल असे जे आवश्यक बदल आहेत ते होतांना दिसत नाही़ त्यामुळे शासकीय किंवा खाजगी शाळांची तुलना केली तर खाजगी शाळांची गुणवत्ता अधिक आहे़प्रश्न- बिहारच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगत असतानाही प्रशासकीय सेवांमध्ये राज्यातील तरुणांचा टक्का कमी आहे, यावर काय सांगाल?धर्माधिकारी- पूर्वी प्रशासकीय सेवांमधून महाराष्ट्रतून एक-दोन विद्यार्थ्याची निवड होत असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. उत्तरप्रदेशच्या पाठोपाठ महाराष्ट्र आहे़ स्थिती चांगली नाही मात्र समाधानकारक म्हणता येईल़ राज्यातून यशस्वी झालेले प्रशासकीय अधिकारी उत्तम व स्वच्छ कारभार हाताळताहेत़प्रश्न- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबद्दल पाहिजे तेवढा आत्मविश्वास नाही, त्याबाबत विद्यार्थ्यांना आपण काय सल्ला देणार?धर्माधिकारी- बुध्दी प्रत्येकाकडे आहे, मात्र आपण कोणत्या क्षेत्रात तज्ज्ञ आहे. ते ओळखले पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही अवघड परीक्षा आहे. ती असलीच पाहिजे कारण त्याव्दारे निवडले जाणारे विद्यार्थी देशाचा कारभार चालवतात़ म्हणून ग्रामीण भागातील मुलांनी आम्हाला जमणार नाही, असे मानण्याचे कारण नाही़ शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मुले स्पर्धा परीक्षेत यश मिळवीत आहेत. यासाठी अर्थात समर्पण, चिकाटी हवीच़ विशेषत: खान्देशातील मुलांसमोर तर वरणगाव येथील अनिकेतचे उदाहरण आहे़ की जो २१ व्या वर्षी युपीएसपीच्या परीक्षेत देशात १९ वा आला. त्यामुळे अनिकेत करु शकलो तर आपण ही करु शकतो, असा आत्मविश्वास मुलांनी बाळगायला हवा़

टॅग्स :Jalgaonजळगावeducationशैक्षणिक