शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

चाळीसगावची ‘कृषी नवदुर्गा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 3:05 PM

'ती' मात्र नव्या जोमाने स्वमालकीच्या शेतीमातीत पाय रोवून उभी राहिली आणि अवघ्या पाच वर्षात जमिनीच्या तुकड्याचा कायापालटच केला.

ठळक मुद्देशेतीमातीची हिरवीमाळशारदा ठुबेंनी फुलवली चार एकरात विषमुक्त झिरोबजेट शेती

चाळीसगाव : नोकरी मिळत नसल्याने पतीला अपयश आलेले. 'ती' मात्र नव्या जोमाने स्वमालकीच्या शेतीमातीत पाय रोवून उभी राहिली आणि अवघ्या पाच वर्षात जमिनीच्या तुकड्याचा कायापालटच केला. चार एकर क्षेत्रात शारदा समाधान ठुबे यांनी विषमुक्त झिरोबजेट शेती फुलवली असून, एकरी ७० हजारांचे त्या उत्पन्न घेत आहेत. परिस्थिती आणि रासायनिक शेतीला हरवत शारदा ठुबे हिरव्यागार रंगातल्या ‘कृषी नवदुर्गा’ ठरल्या आहेत.समाधान ठुबे हे पदवीधर. हस्ताक्षर चांगले असल्याने त्यांनी काहीकाळ पेंटर म्हणूनही काम केले. शैक्षणिक कागदपत्रे पुढे करून त्यांनी नोकरीचा पाठलाग केला. मात्र त्यांना अपयश आले. उपजीविकेसाठी काही तरी करावे म्हणून स्वमालकीच्या शेतीची वाट धरली. शारदादेखील त्यांच्यासोबत पाय रोवून उभ्या राहिल्या. या दाम्पत्याने पिंपरखेड शिवारातील आपल्या शेतीला हिरवेगार रुपडे दिले असून चार एकरात विषमुक्त नैसर्गिक शेतीचा नवा पॅटर्न निर्माण केला आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाला व धान्याला मोठी मागणी आहे. काळ्या मातीच्या उदरात हिरवं सोनं असत. त्यासाठी श्रमाचे सिंचन हवे असते, असं सांगताना ठुबे दाम्पत्याचा ऊर भरुन येतो.‘ती’चे कठोर परिश्रमठुबे दाम्पत्य हे मेहनती आहे. त्यांना दोन्ही मुली आहेत. समाधान ठुबे यांनी विषमुक्त झिरोबजेट शेतीचा प्रयोग राबविला आहे. गत १० वर्षात त्याला यशाची फळे लागली आहे.विनाखर्च शेती असल्याने सर्व कामे शारदा ठुबे स्वत:च करतात. निंदणी, भाजीपाला लावणे, टोपणी, पिकलेले उत्पन्न काढणे, त्याचे पॅकींग करणे. इथपर्यंतची कामे करताना त्या कुणाचीही मदत घेत नाही.उत्पादित भाजीपाला व धान्य पॅकींग करुन समाधान ठुबे चाळीसगाव शहर परिसरात घरपोच विकतात.शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते ठुबे दाम्पत्य स्वत:च तयार करतात. त्यांना यासाठी कोणताही इतर आर्थिक खर्च करावा लागत नाही. त्यांचे हे झीरो बजेट शेती मॉडेल शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले आहे.एकरी ७० हजाराची ‘धनलक्ष्मी’शारदा ठुबे यांची कठोर मेहनत त्यांच्या कुटुंंबासाठी धनलक्ष्मी ठरली आहे. त्यांनी १० वर्षात परिस्थितीचा वध करीत आपण कृषी नवदुर्गा आहोत हेच अधोरेखित केले आहे. एकूण चारपैकी प्रत्येकी एक एकरात लागवड केली जाते. त्यांना एकरी ७० हजार रुपये मिळतात. कुठलाही अन्य खर्च नसल्याने चार एकरात अडीच लाखाचे उत्पन्न मिळते. शारदा आणि समाधान यांच्या 'मॉडेल' शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातील शेतकरी व अभ्यासकही येथे येत असतात.एक महिला पदर खोचून पाय रोवून उभी राहिली की, कुटुंबाचा आधारवड कशी ठरते. याचे शारदा ठुबे मूर्तिमंंत प्रतिकच ठरतात. यंदाच्या नवरात्रोत्सवातील त्या कृषी नवदुर्गाच आहेत.पती समाधान यांनी विषमुक्त झिरो बजेट शेतीचा पर्याय समोर ठेवल्यानंतर मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. शेतीची सर्व मी करायची. समाधान यांनी उत्पादित मालाच्या विक्रीचे काम सांभाळायचे. संसाराचा गाडा आम्ही असा ओढतोय. १० वर्षात काळ्या आईने आम्हाला भरभरुन दिले. विषमुक्त शेती उत्पादन घेत आहोत. याचेही मोठे समाधान आहे.- शारदा समाधान ठुबे, महिला शेतकरी, चाळीसगाव 

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव