चाळीसगावच्या बेलगंगा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:06 IST2018-12-07T13:05:55+5:302018-12-07T13:06:36+5:30

दरदिवशी २५०० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार

Chalisgaon's Belgauma Sugar Factory launched the crushing season | चाळीसगावच्या बेलगंगा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

चाळीसगावच्या बेलगंगा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

चाळीसगाव, जि. जळगाव : तब्बल दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बेलगंगा साखर कारखाना पुन्हा सुरु झाला असून शुक्रवारी प्रथम गाळप हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन झाले.
दहा वषार्पूर्वी बंद पडलेल्या बेलगंगा साखर कारखान्याची यंत्रे पुन्हा धडधडणार असल्याचे वारे काही महिन्यांपासून तालुक्यात वाहू लागल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. बेलगंगेची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर शुक्रवारी या ‘गोड’ पर्वाचा शुभारंभ होत आहे.
या वेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, एकनाथराव खडसे हे जिल्ह्यातील दिग्गज नेते एकत्र आले होते. या सोबतच विविध मान्यवरदेखील उपस्थित होते.

Web Title: Chalisgaon's Belgauma Sugar Factory launched the crushing season