चाळीसगावात अनेक गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 13:32 IST2021-08-31T13:31:52+5:302021-08-31T13:32:20+5:30
चाळीसगावात ढगफुटी झाल्याने अनेक गावांची संपर्क तुटला आहे.

चाळीसगावात अनेक गावांचा संपर्क तुटला
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : रात्री ढगफुटी सदृश पाऊस पडून चाळीसगाव शहरातील तितुर नदीसह वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुराने वेढले आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला असून अचानकपणे पडलेल्या या पावसामुळे जनावरे, शेती अवजारे वाहून गेली असून मनुष्यहानीदेखील झाली असल्याची माहिती मिळत आहे. कन्नड घाटात देखील दरड कोसळल्याने वाहतूक बंद आहे.
सायगाव येथे व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मन्याड धरणात वाढ झाल्याने पुरात वाढ झाल्याने मन्याड नदीच्या पात्रात अचानक वाढ झाली आहे.
पिडीतांची तात्पुरत्या निवाऱ्याची सोय
सर्व पूर पिडीतांची नगरपरिषदेकडून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात येणार असून त्यांना जीवनावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहे. संपर्कातील पूर पिडीतांची माहिती नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्वरित करुन द्यावी असे आवाहन चाळीसगाव नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे
कजगावात एकजण अडकला
कजगाव, ता. भडगाव : तितुर नदीच्या पुरात कजगाव चा एक इसम अडकला त्याला बाहेर काढण्यासाठी अद्याप बचाव कार्य दाखल झालेले नाही. सदर इसम जीव मुठीत धरत झाडावर बसलेला आहे.