चाळीसगावला माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 17:56 IST2024-02-07T17:56:40+5:302024-02-07T17:56:53+5:30
महेंद्र मोरे हे हनुमानवाडीतील आपल्या कार्यालयात बसलेले असतांना सायंकाळी पावणेपाच वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

चाळीसगावला माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार
जिजाबराव वाघ
चाळीसगाव (जि.जळगाव) : चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर तीन अज्ञात युवकांनी गोळीबार केला. यात ते जबर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे शहर हादरले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली.
महेंद्र मोरे हे हनुमानवाडीतील आपल्या कार्यालयात बसलेले असतांना सायंकाळी पावणेपाच वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. पालिकेच्या मावळत्या सभागृहात त्यांच्या पत्नीही नगरसेविका होत्या.