भडगावात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 20:26 IST2019-07-26T20:24:39+5:302019-07-26T20:26:12+5:30
भडगाव शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या जागी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, या आशयाचे पत्र भडगाव पोलिसांनी पालिकेला दिले आहे.

भडगावात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे
भडगाव, जि.जळगाव : शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या जागी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, या आशयाचे पत्र भडगाव पोलिसांनी पालिकेला दिले आहे.
पत्रात नमूद केले आहे की, या पोलीस स्टेशन हद्दीत सुरक्षेच्या दृष्टीने शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. यात शहरातील मेढ्या मारुती मंदिर, जामा मशीद, मर्कस मशीद परिसर या भागात संमिश्र लोकवस्ती आहे. गंजीवाडा मदरसा या भागातही मिश्र वस्ती आहे. पारोळा चौफुली बस स्टॅड परिसर या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहतुकीचे प्रमाण अधिक असते. या भागात दुकाने असून, शहरातील सर्व जातीधर्माचे लोक या ठिकाणी जमतात. आझाद चौकात मिश्र वस्ती आहे. या भागातही राममंदिर आहे. गणपती, दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीचे महत्वाचे ठिकाण आहे. शहरातील शनीचौकात गावाबाहेर गिरणा नदीचे काठावर शनीमंदिर, हनुमान मंदिर अशी पाच-सहा छोटी-मोठी मंदिरे आहेत. जागृती चौक मिरवणुकीचा मार्ग आहे. या भागातही हिंदू-मुस्लीम समाजाची मिश्र वस्ती आहे. परिणामी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे.
या पत्रावर भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांची सही आहे. बसस्टॅड भागातही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे. हा भाग प्रवाशांसह नागरिकांच्या नेहमी वर्दळीचा भाग असतो. बसस्थानक भागात चोऱ्यांचे प्रकार अनेकदा होताना दिसतात. तसेच शाळेच्या मुला, मुलींना व प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे.