शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भुसावळ तालुक्यातील तळवेल-हातनूर गटाच्या जि.प.सदस्या सरला कोळी यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 9:45 PM

भुसावळ तालुक्यातील तळवेल-हतनूर जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या सदस्या सरला कोळी यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निकाल नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने दिला आहे.

ठळक मुद्देनंदुरबार जात पडताळणी समितीचा निकालसदस्यत्व रद्द होणार का? जिल्हाधिकाºयांच्या निकालाकडे लक्षफायदे घेतले असल्यास कारवाई करण्याचे तहसीलदारांना आदेश

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील तळवेल-हतनूर जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या सदस्या सरला कोळी यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निकाल नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने दिला आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द होणार का? जिल्हाधिकाºयांच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे .जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीनंतर जात पडताळणी विभागाचा हा पहिलाच निकाल असल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सरला कोळी यांनी तळवेल-हातनूर या अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या गटातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी विजय प्राप्त केला होता. ही निवडणूक त्यांनी सरला हरचंद तावडे हा वडिलांकडील नावाचा जातीचा दाखला जोडून लढवली होती. मात्र त्यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात सुसरी येथील रामचंद्र प्रकाश मोरे यांनी नंदुरबार येथील जात पडताळणी विभागाकडे तक्रार केली होती.त्यासंदर्भात जात पडताळणी समितीचे सदस्य गणेश इवाने, सदस्य सचिव तथा उपसंचालक शुभांगी सपकाळ व उपाध्यक्ष बबिता गिरी या त्रिसदस्य समितीने सर्व कागदपत्रे व वस्तुस्थिती इत्यादी तपासून महाराष्ट्र अ‍ॅक्ट क्र.१३ चा २००१ च्या जात पडताळणी समितीच्या निर्णयानुसार सरला कोळी यांचे जातीचे प्रमाणपत्र टोकरे कोळी प्रवर्गात मोडत नाही, असा निकाल १५ नोव्हेंबर रोजी (आदेश क्रमांक ६/४९९/ निवडणूक / ०१२ /१०९/८०१/१०१५९/२०१८ प्रमाणे) दिला आहे. निकालाच्या प्रति निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व भुसावळ येथील तहसीलदार यांना पाठवण्यात आले असल्याचे आदेशांमध्ये नमूद करण्यात आले आहे.फायदे घेतले असल्यास कारवाई करण्याचे तहसीलदारांना आदेशदरम्यान, संबंधितांनी जातीच्या दाखल्यावर राखीव प्रवर्गातील फायदे घेतले असल्यास त्यांच्याविरुद्ध कलम ११ (१) च्या १० नुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे तहसीलदारांना देण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.जि.प.व तहसीलदार कार्यालयात अद्याप आदेश नाहीदरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अकलाडे व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याकडे अद्याप आदेश प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ