जळगावच्या साडी व्यापाऱ्याच्या कारच्या रस्तालूूट प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 19:02 IST2018-09-02T19:02:33+5:302018-09-02T19:02:50+5:30
रावेर पोलीस पथक मध्य प्रदेशात रवाना

जळगावच्या साडी व्यापाऱ्याच्या कारच्या रस्तालूूट प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
रावेर, जि.जळगाव : जळगाव येथील साडीच्या घाऊक व्यापाºयाच्या नोकरास कारमधून लुटल्याप्रकरणी तपासासाठी पोलीस पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे.
जळगाव येथील बळीरामपेठेतील सीमा शिल्क या साड्यांचे घाऊक व्यापारी राजकुमार मोटनदास नाथाणी (रा.सिंधी बस्ती, जळगाव) यांच्या विक्री केलेल्या साडीच्या मालाची बºहाणपूर येथील कापड दुकानदारांकडून थकीत रकमेची वसुली करण्यासाठी त्यांचा नोकर नाथुसिंग मोटूसिंग छोटूसिंग मेडतियाँ (राबोठडा, अजमेर, राजस्थान, ह.मु.राधाकृष्ण नगर, जळगाव) व कारचालक गणेश निंबा पाटील (रा.ममुराबाद, ता.जळगाव) हे गेले होते. संबंधित कापड दुकानदारांकडून त्यांनी वसुली करून ते त्यांच्या कार (एमएच-१९-बीयू-४४२६) ने परतीच्या प्रवासाला जळगावकडे निघाले. दरम्यान, खानापूर ते कर्जोद दरम्यान असलेल्या रावेर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील काटेरी झुडपांच्या समोर सन्नाटा असल्याची संधी साधून कारचा पाठलाग करत आलेल्या व तोंडावर कापडे बांधलेल्या दोन धिप्पाड व उंच अशा अज्ञात चोरट्यांनी चालकाच्या खिडकीतून त्याच्या तोंडावर अंडे व त्यावर मिरची पुड फेकून तथा मोटारसायकल कारपुढे आडवी लावली. त्यांच्या हातातील लांब सुºयाच्या साह्याने हल्ला केला असता चालक गणेश निंबा पाटील याने प्रतिकार केला. त्याच्या डाव्या हाताच्या मनगटाला इजा झाली.
दरम्यान, क्लिनरसाईडने बसलेल्या वसुली कर्मचाºयाने हा थरार पाहून कारमधील मागच्या सीटवर उडी मारून चालकाच्या आसनामागे लपण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्याही अंगावर मिरची पुड फेकून त्याच्या हातातील ८१ हजार रुपये रोकड व अंदाजे एक लाखाचे धनादेश असलेली बॅग, कारच्या चाव्या दोघांचे मोबाइल हिसकावून रस्तालूूट करत पोबारा केला.
ही थरारक घटना शनिवारी रात्री अवघ्या सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, संबंधित व्यापारी जळगावहून रावेर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे दोन्ही नोकर प्रामाणिक असल्याचा विश्वास त्यांनी प्रकट केल्याने, त्यांचा नोकर मोटूसिंग छोटूसिंग मेडतियाँ यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रात्री घटनास्थळी फैजपूर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, फौजदार दिपक ढोमणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी फौजदार दीपक ढोमणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक मध्यप्रदेशात रवाना केले आहे. पुढील तपास फौजदार जाधव करीत आहेत.