यावल तालुक्यातील गिरडगाव जवळ कारने अचानक पेट घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:14 IST2019-01-05T18:12:27+5:302019-01-05T18:14:02+5:30
यावल तालुक्यातील गिरडगाव येथे महामार्गावर प्रवासी वाहतूक करणारी धावती कार अचानक पेटल्याने जळून खाक झाली, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यावल तालुक्यातील गिरडगाव जवळ कारने अचानक पेट घेतला
यावल, जि.जळगाव : तालुक्यातील गिरडगाव येथे महामार्गावर प्रवासी वाहतूक करणारी धावती कार अचानक पेटल्याने जळून खाक झाली, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. कारने अचानक पेट घेताच ‘द बर्निंग कार’चे दृश्य दिसत होते.
बºहाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील यावल-चोपडा रस्त्यावरील गिरडगाव गावाजवळ यावलकडून एमएच-१९-एएफ-५९८७ क्रमांकाची कार प्रवासी घेऊन येत होती. या वाहनात पाच प्रवासी होते. या कारने अचानक पेट घेण्यास सुरुवात केली. कारच्या इंजिनच्या पुढील भागातून आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. तेव्हा आग लागल्याचे लक्षात येताच कारचालकाने कार थांबविली व सर्व प्रवासी कारमधून खाली उतरले. यामुळे सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. ही कार यावलहून चोपडा मार्गे अमळनेर येथे जात होती.
परिसरातील नागरिकांसह अग्निशमन बंबाने विझविली. मात्र याआधीच कार जळून खाक झाली. घटनेचे वृत्त कळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
यावल येथील रहिवासी रेहानखान यांच्या मालकीची ही कार होती.