शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

कार झाडावर आदळून भीषण अपघात! तीन तरुण ठार,जळगाव जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:30 IST

हा अपघात एवढा भीषण होता की होंडा सिटी कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा गावाजवळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला.  

सावदा (जि.जळगाव) : भरधाव चारचाकी झाडावर आदळून तीन तरुण जागी  ठार झाले. ही भीषण घटना सावदा - रावेर मार्गावर शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन तरुण ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. 

 हा अपघात एवढा भीषण होता की होंडा सिटी कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा गावाजवळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला.  

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण समजले; तीन वर्षांनी संसदेत रिपोर्ट सादर

मिळालेली माहिती अशी,  अपघातात ठार झालेले तिघे तरुण हे जळगाव जिल्ह्यातील रावेरचे रहिवासी होते. शुभम सोनार, मुकेश रायपूरकर आणि जयेश सोनार अशी त्यांची नावे आहेत. या अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण भुसावळ येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेलेले होते. कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना सावदा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची भरधाव कार झाडावर आदळली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात गणेश भोई, अक्षय उन्हाळे व विकी जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात होंडा सिटी कार अक्षरशः चक्काचूर झाली. कार भरधाव वेगात झाडावर आदळल्याने तिचे इंजिन अपघात स्थळापासून वीस फूट अंतरावर पडलेले दिसून येत आहे. तसंच कारची पुढची दोन्ही चाकं देखील निखळून बाजूला पडलेली आहेत. या अपघातात ठार झालेला मुकेश रायपुरकर याचा गुरुवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर काही तासातच त्याचा अपघातात मृत्यू झाला आहे.

 या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रावेर शहरातील नागरिकांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं. तीन कुटुंबातील तरुण मुलांचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव