शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

भगवान श्रीकृष्णाचा बंदीवास अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 12:35 IST

आज श्रीकृष्ण जयंती : मूर्ती कॉपीराइट प्रकरणात अडकली

जळगाव : भगवान श्रीकृष्णाचा जन्म बंदीवासात झाला होता. वासुदेवाने त्यांना बंदीवासातून बाहेर नेले. मात्र १६ वर्षांपासून जळगावातील भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बंदीवासातच आहे. सन २००४ पासून हा बंदीवास सुरु आहे. इथे एक नाही तर चक्क दोन कुलूपे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एकेकाळी जळगाव जिल्ह्यात स्वाध्याय परिवाराचे काम अतिशय जोमात होते. सर्व सूत्रे प्रा. सु.का. जोशी यांच्याकडे होती. परंतु मध्यंतरी स्वाध्याय परिवार आणि जोशी यांच्यात वाद झाला.प्रा. जोशी यांनी जळगावातील नूतन मराठा कॉलेजशेजारील गल्लीत ज्ञानेश्वर मंदिराची उभारणी केली. या मंदिरात भगवान योगेश्वर श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती आमचाच ‘कॉपीराइट’ असल्याचा आक्षेप पांडूरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराकडून घेण्यात आला. इथूनच वादाची ठिणगी पडली आणि प्रकरण थेट न्यायालयात पोहचले.वाद वाढल्याने न्यायालयाने ही मूर्ती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस ठाण्यात मूृर्ती आणण्यात आली. इथूनच या श्रीकृष्ण मूर्तीचा बंदीवास पुन्हा सुरु झाला. जवळपास दीड ते दोन वर्षे ही मूृर्ती पोलीस ठाण्यात होती.यानंतर न्यायालयाने या मूर्तीची पोलीस ठाण्यातून सुटका केली आणि ज्ञानेश्वर मंदिरातच ही मूर्ती कुलूप बंद ठेवण्यात यावी असे आदेश दिले. शिवाय पूजा अर्चना करण्यास बंदी घातली. त्यानुसार मंदिरात मूर्ती आणण्यात आली. आता ती कुलूपबंद आहे. सध्या दोन कुुलुपे आहेत. एक मंदिराचे आणि दुसरे पांडूरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराने लावलेले. मंदिराच्या मागील बाजूस ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या वादाशी संबंधित प्रा.सु.का.जोशी, स्वाध्याय परिवाराचे भीष्मराज बाम यांचे मध्यंतरी निधन झाले. त्यामुळे या वादाशी संबंधित हालचाली मंदावल्या आहेत.कॉपीराइट नाहीही मूर्ती म्हणजे आम्ही कॉपीराइट केलेली नाही. स्वाध्याय परिवाराकडील मूृर्ती ही योगेश्वराची आहे तर आमच्याकडील मूृर्ती ही योगेश्वर श्रीकृष्णाची असल्याचा दावा मंदिराशी संबंधित असलेले प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे यांनी केला आहे.आमच्याकडील मूर्ती आणि स्वाध्याय परिवाराकडील मूर्ती यांच्यात ४२ ठिकाणी फरक आहे. स्वाध्याय परिवाराकडील मूृर्तीचा डावा पाय पुढे आहे तर आमच्याकडील मूर्तीचा उजवा पाय पुढे आहे.- प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव