जळगावात जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाजातर्फे कॅण्डल मार्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 21:06 IST2023-10-29T21:06:21+5:302023-10-29T21:06:50+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जळगावात जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाजातर्फे कॅण्डल मार्च
-भूषण श्रीखंडे
जळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रविवारी जळगाव शहरात मराठा समाजाने कँण्डल मार्च काढला. तसेच जळगाव जिल्ह्यातील सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असून आरक्षण मिळाल्या शिवाय मराठा समाज शांत बसणार नाही असे कँण्डल मार्च दरम्यान मराठा समाजातील पदाधिकारी यांनी भाषणातून सांगितले. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जळगाव जिल्हा सकल मराठा समाजातर्फे रविवार दि. २९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा येथे कँण्डल मार्चचे आयोजन केले होते. मराठा समाजातील पुरुष, महिला तसेच लहान मुले यावेळी उपस्थित होते. मराठा समाजाचे डी. डी. बच्छाव यांनी यावेळी मराठा उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील सर्व मराठा समाज सोबत असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांनी मेणबत्ती लावून छत्रपती शिवाजी महाराज, मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा जय घोष केला. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा ते कोर्ट चौक दरम्यान कँण्डल मार्च काडून चौकात एकत्र जमून घोषणाबाजी व मेणबत्ती लावून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणाबाजी परिसर दणाणून सोडला.