तर उमेदवारांना आधार व मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 06:12 PM2020-08-19T18:12:11+5:302020-08-19T18:12:36+5:30

जळगाव : कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवारांकडून नावनोंदणी करण्यात येत असते. परंतु, बहुतांश उमेदवारांनी त्यांचे आधारकार्ड क्रमांक प्रोफाईलमध्ये जोडलेले नसल्याचे, ...

Candidates must add Aadhaar and mobile numbers | तर उमेदवारांना आधार व मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य

तर उमेदवारांना आधार व मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य

Next

जळगाव : कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवारांकडून नावनोंदणी करण्यात येत असते. परंतु, बहुतांश उमेदवारांनी त्यांचे आधारकार्ड क्रमांक प्रोफाईलमध्ये जोडलेले नसल्याचे, त्याचबरोबर आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक केलेले नसल्याचे निदर्शनास आढळून आलेले आहे़ त्यामुळे तात्काळ उमेदवारांनी आधारकार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य आहे, अन्यथा ३१ आॅगस्ट अखेर नोंदणी रद्द करण्यात येईल, असे संबंधित विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील उमेदवारांची आॅनलाईन नांवनोंदणी सन २०१३ पासून कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर सुरु असून उमेदवारांकडून विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन नावनोंदणी करीतच आहेत. आॅनलाईन नांवनोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुशंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येतो. मात्र, अद्यापही आॅनलाईन नांवनोंदणी केलेल्या बहुतांश उमेदवारांनी त्यांचे आधार क्रमांक प्रोफाईलमध्ये नमूद केलेला नाही. तसेच आधारक्रमांकाला जोडलेला (लिंक केलेला) मोबाईल क्रमांकही नमूद केलेला नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळाचा उपयोग करतांना अडचणी निर्माण होत आहे़ तरी नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आधार व प्रोफाईल विभागाच्या संकेतस्थळावर तात्काळ अपडेट न केल्यास नोंदणी ३१ आॅगस्ट, अखेर रद्द होईल. याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ९़४५ ते संध्या ६़१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Web Title: Candidates must add Aadhaar and mobile numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.