कपडे खरेदीसाठी शिरपूर येथून जळगाव येथे आलेल्या तरुणाला ट्रकने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:41 IST2018-09-30T12:40:43+5:302018-09-30T12:41:27+5:30

मामेभावाचा मृत्यू तर आतेभाऊ जखमी

To buy clothes, a truck was hurled by a truck from Shirpur to Jalgaon | कपडे खरेदीसाठी शिरपूर येथून जळगाव येथे आलेल्या तरुणाला ट्रकने उडविले

कपडे खरेदीसाठी शिरपूर येथून जळगाव येथे आलेल्या तरुणाला ट्रकने उडविले

ठळक मुद्देमहामार्गावर पुन्हा अपघातओव्हरटेक करताना दुचाकीला उडविले

जळगाव : जळगाव शहरातून नवीन कपडे व मोबाईल खरेदी करुन एरंडोल येथे जात असताना समोरुन ओव्हरटेक करताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने उडविल्याने सागर प्रताप अहिरे (वय १८, रा.बालाजी मंदिराजवळ, शिरपूर, जि.धुळे) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा मामाचा मुलगा कन्हैय्या सदाशिव महाले (वय १७, रा. एरंडोल) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी दुपारी साडे तीन वाजता राष्टÑीय महामार्गावर महामार्ग पोलीस चौकीजवळच झाला.
ट्रक चालकाला घेतले ताब्यात
हा अपघात होताच महामार्ग चौकीवरील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जैन इरिगेशनच्या रुग्णवाहिकेतून दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविले. सागर याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. कन्हैय्या याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, पाळधी पोलिसांनी ट्रक चालक राजेंद्रसिंग ठाकूर (रा.उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले आहे. हा ट्रक ठाणे येथून जयपूर जात होता.
कमावता तरुण गेला
सागर याच्या वडीलांचे निधन झालेले आहे, तर लहान भाऊ शिक्षण घेत आहे. आई गृहीणी आहे. सागर हा कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा होता. तो कंपनीत कामाला होता. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच एरंडोल येथील मामा, मामी व अन्य नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, ट्रक चालकाला ट्रकसह ताब्यात घेतले असले तरी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
ओव्हरटेक करताना दुचाकीला उडविले
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सागर प्रताप अहिरे हा तरुण एरंडोल येथील मामा सदाशिव महाले यांच्याकडे आलेला होता. शनिवारी मामांचा मुलगा कन्हैय्या याला घेऊन तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.पी.७३१५) जळगाव शहरात कपडे व मोबाईल घेण्यासाठी आला होता. शहरातील काम आटोपल्यानंतर दुपारी तीन वाजता दोन्ही मामेभाऊ-आतेभाऊ एरंडोल जाण्यासाठी निघाले. साडे तीन वाजता राष्टÑीय महामार्गावर महामार्ग पोलीस चौकीजवळच एरंडोलकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने (क्र .एम.एच.०४ जे.के.३२३२) ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला उडविले. त्यात मागे बसलेला सागर हा लांब फेकला गेला व डोक्याला मार बसल्याने जागीच गतप्राण झाला.

Web Title: To buy clothes, a truck was hurled by a truck from Shirpur to Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.