व्यावसायिकाला लुटणाऱ्यास पिंप्राळ्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:01+5:302021-07-31T04:17:01+5:30
जळगाव : गुजराल पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या व्यावसायिकाच्या गळ्यातील सोन्याची चेन लुटल्याप्रकरणी चौथ्या संशयित चोरट्यास पकडण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश ...

व्यावसायिकाला लुटणाऱ्यास पिंप्राळ्यातून अटक
जळगाव : गुजराल पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या व्यावसायिकाच्या गळ्यातील सोन्याची चेन लुटल्याप्रकरणी चौथ्या संशयित चोरट्यास पकडण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश आले आहे. महेंद्र गाडेकर (२४, रा. पिंप्राळा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
व्यावसायिक नामदेव पाटील यांचे गुजराल पेट्रोल पंपाजवळ कार्यालय आहे. कार्यालयाबाहेर ते उभे असताना, त्याठिकाणी चार तरुण आले व त्यांनी पाटील यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लुटून नेली होती. ही घटना ऑक्टोबर २०२० महिन्यात घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. चौथा संशयित महेंद्र गाडेकर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. त्यातच महेंद्र हा पिंप्राळा भागात फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी लागलीच पिंप्राळा गाठून महेंद्र याला अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, नाना तायडे, रवींद्र साबळे, रामेश्वर ताटे, अशोक संगत आदींनी केली आहे.