शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे महामार्गाच्या वाहनाची बसला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 4:41 PM

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या मिक्सर वाहनाने बसला धडक दिली. यात प्रवाशांना इजा झालेली नसली तरी पुढे जाण्यात मोठा खोळंबा झाला.

ठळक मुद्देबसचे नुकसानवाहतूक विस्कळीतपुढे जाण्यास विलंबअपघातग्रस्त बस व मिक्सर वाहन पोलीस ठाण्यात हलवले

भुसावळ, जि.जळगाव : महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या मिक्सर वाहनाने बसला धडक दिली. यात प्रवाशांना इजा झालेली नसली तरी पुढे जाण्यात मोठा खोळंबा झाला. प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. तसेच वाहतूक विस्कळीत झाली. शनिवारी सायंकाळी सातला साकेगाव येथे बसस्थानक चौकात ही घटना घडली.धुळे येथून बुलढाणाकडे जाणारी बस (क्रमांक एमएच-४०-क्यु-६२५०) भुसावळकडे जात होती. याचवेळी साकेगाव बसस्थानकावर महामार्ग चौपदरीकरण करणाºया कामाचे मिक्सर (क्रमांक एनएच-१९-सीवाय-२९४५) या वाहनाचे गियर पुढे न पडता मागे पडले. यामुळे सिमेंटने भरलेले वाहन पुढे न जाता मागे येणाºया बसवर अचानक धडकले. या घटनेमुळे बसमध्ये बसलेल्या ३७ प्रवाशांना धक्का बसला. घटनेमुळे बसच्या क्लिनर साईडच्या काचा फुटल्या. यावेळी प्रवाशांनी एकच ओरड केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटना घडताच साकेगावचे नागरिक अगदी क्षणार्धात घटनास्थळी पोहोचले व घाबरलेल्या प्रवाशांना धीर दिला.आजारी व तत्काळ कामासाठी जाणाºया प्रवाशांचे प्रचंड हाललांब पल्ल्याच्या धुळे बुलढाणा बसमध्ये वयोवृद्ध, आजारी मंडळी तसेच शासकीय कामानिमित्त जाणाºया तरुणांचे बस अपघातामुळे हाल झाले. बसचालक नंदलाल राठोड व वाहक काटकर यांनी इतर बसेसला थांबवण्याचे प्रयत्न केले. परंतु बसेस थांबल्या नाही. या घटनेमुळे बसमधील प्रवासी पर्यायी बसची व्यवस्था लवकर न झाल्यामुळे ताटकळत साकेगाव स्थानकावरच थांबले. सुदैवाने या घटनेमध्ये एकाही प्रवाशाला इजा झाली नाही.वाहतूक विस्कळीतया घटनेमुळे महामार्गावर बघ्यांच्या गर्दीमुुळे व वाहनांच्या रांगेमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पो.हे.काँ. विठ्ठल फुसे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक साकेगावकºयांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली.बस व मिक्सर वाहन पोलीस ठाण्यातअपघातग्रस्त बस व मिक्सर वाहन यास तालुका पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी पोलीस ठाण्यात हलवले.

टॅग्स :AccidentअपघातBhusawalभुसावळ