शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

रावेर तालुक्यातील खानापूर येथे घरफोडी, दीड ते पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:06 PM

साखरपुड्यात आलेले दागिने लंपास

ठळक मुद्दे१५ हजार रूपयांची चिल्लर लंपास खिडकीचे गज कापून व आतील खोलीचा कडीकोयंडा तोडून घरफोडी

रावेर, जि. जळगाव : तालुक्यातील खानापूर येथील लेंडीनाल्यालगतच्या घमा महाजन यांच्या प्लॉटमधील देशी दारू दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कापून डीव्हीआर तथा एलईडी टीव्ही व १५ हजार रूपयांची चिल्लर लंपास करण्यासह शखे शरीफ शेख कल्लू यांच्या घरात चोरी करीत साखरपुड्यात आलेले दागिने व रोख रक्कम असा अंदाजे दीड ते पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आला.खानापूर येथील घमा महाजन यांच्या प्लॉटमधील नवीन वसाहतीत असलेल्या शेख खलील यांच्या मालकीच्या देशी दारूच्या दुकानात व समोर लावलेल्या चार ते पाच सीसीटीव्ही कॅमेºयांचे संयोजन तोडून व दुकानात घरफोडी करून १५ हजार रुपयेची चिल्लर रोकड, एक एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमे-यांचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर लंपास केला. त्यानंतर त्यांनी दुकानालगतचे तारकुंपण कटरने कापून माजी सरपंच विनोद वाघ व प्रमोद वाघ यांच्या शेतातून मार्ग काढून शेख शरीफ शेख कल्लू यांच्या घराच्या मागील भिंतीवरील खिडकीचे गज कापून व आतील खोलीचा कडीकोयंडा तोडून घरफोडी केली. त्यात लोखंडी कपाटातील दागिने व रोकड असलेला अ‍ॅल्युमिनीयमचा डबा, एक साड्यांची भरलेली बॅग बाहेर अस्ताव्यस्त फेकून, त्यातील तीन तोळ््याचे सोन्याचे दोन नेकलेस हार, इतर सोन्याचे दागिने व २३ हजार रू रोख रोकड असा दोन्ही ठिकाणचा अंदाजे दीड ते पाऊणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.

टॅग्स :ThiefचोरJalgaonजळगाव