शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

साहित्य, कला क्षेत्रात योगदान देणारी पिढी घडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 17:52 IST

अशोक सोनवणे : चोपडा येथे ‘मसाप’च्या सभेस साहित्यिकांची उपस्थिती लक्षणीय

चोपडा, जि.जळगाव : चोपडा तालुक्याला साहित्य व सांस्कृतिक अभिरूचीची मोठी परंपरा आहे. या परंपरेचा वारसा भविष्यातही चालावा. कसदार साहित्य निर्माण करण्यासाठी तेवढ्याच ताकदीची पिढी सातत्याने घडत रहावी, असा विचार कायम घोळत असताना वारंवार मराठी साहित्य परिषदेशी संपर्क आला. त्यामुळे मसाप संस्थेच्या माध्यमातून चोपडा तालुक्यात साहित्य, कला क्षेत्रात अधिकाधिक योगदान देणारी पिढी घडवावी म्हणून या मैलाचा दगड असणाऱ्या संस्थेच्या शाखेची मुहूर्तमेढ रोवत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व मसाप शाखेचे नियोजित अध्यक्ष अशोक नीळकंठ सोनवणे यांनी केले.शहरातील विवेकानंद विद्यालयाच्या सभागृहात मसापच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन कवी सोनवणे बोलत होते. या वेळी मंचावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष घनश्याम अग्रवाल, कार्यवाह श्रीकांत नेवे, डॉ.विकास हरताळकर, शाखेच्या कार्यकारणीतील उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रमुख कार्यवाह संजय बारी, कार्यवाह गौरव महाले, कोषाध्यक्ष योगेश चौधरी आदी उपस्थित होते.@१७ रोजी पार पडत असलेला मराठी साहित्य परिषदेचा उद्घाटन सोहळा सर्व सभासदांनी घरचे मंगलकार्य समजून उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष घनश्याम अग्रवाल यांनी केले.या सर्वसाधारण सभेत प्रास्ताविक कार्यवाह संजय बारी यांनी केले. या वेळी योगेश चौधरी, रमेश पाटील, संजीव शेटे, प्रभाकर महाजन, पंकज शिंदे, रमेश शिंदे, जयश्री चव्हाण आदींनी चर्चेत सहभाग घेतला. गौरव महाले यांनी आभार मानले. यावेळी मसापचे सभासद उपस्थित होते.‘खिडकी बाहेरचे जग’चे प्रकाशनमसापच्या चोपडा शाखेचे उद्घाटन मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या हस्ते व कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तसेच कविवर्य अशोक सोनवणे यांचा बारावा काव्यसंग्रह ‘खिडकी बाहेरचे जग’चे प्रकाशनदेखील या सोहळ्यात होणार आहे. याप्रसंगी मसाप कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप, कार्यवाह प्रा.वि.दा.पिंगळे, चित्रकार धनंजय गोवर्धने, तहसीलदार व साहित्यिक आबा महाजन हे मान्यवर उपस्थित राहतील.

टॅग्स :literatureसाहित्यChopdaचोपडा