जळगावात घरात घुसून गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 11:16 IST2021-09-23T11:14:36+5:302021-09-23T11:16:45+5:30
आकाशच्या भावाने गोळीबार करणाऱ्याला पकडून ठेवल्याने यात कुटुंबातील सर्वांचा जीव वाचला.

जळगावात घरात घुसून गोळीबार
जळगाव : शहरातील कांचन नगर भागात गुरुवारी सकाळी ९ वाजता दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी घरात घुसून आकाश सपकाळे या तरुणावर गोळीबार केला. आकाशच्या भावाने गोळीबार करणाऱ्याला पकडून ठेवल्याने यात कुटुंबातील सर्वांचा जीव वाचला. आकाशच्या करंगळीला गोळी लागली आहे.
पळून जाताना हल्लेखोरांमधील एक जण पाय घसरून पडला. त्यात तो बेशुद्ध झाला. यात दोन जण जखमी झाले आहेत. ५ नोव्हेंबर २०१० रोजी माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याचा खून झाला होता, त्यात आकाश सपकाळे आरोपी होता. तो सध्या जामिनावर आहे. या हल्ल्याची त्या घटनेशी किनार असल्याचे बोलले जात आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, शनी पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांचा शोधार्थ पथक रवाना झाले आहेत.