दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या सफाई कामगाराला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 21:31 IST2019-06-23T21:29:39+5:302019-06-23T21:31:36+5:30

गेल्या २१ वर्षापासून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सफाईचे काम करणा-या श्याम राजू चव्हाण या तरुणाच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी एमआयडीसी पोलीस व स्पेक्ट्रम कंपनीचे दीपक चौधरी यांनी रविवारी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीच्या हातामुळे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या श्यामच्या जीवनात प्रकाश उजेडणार आहे.

Both hands have a handful of fireworks with a blue-collared worker | दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या सफाई कामगाराला मदतीचा हात

दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या सफाई कामगाराला मदतीचा हात

ठळक मुद्देशस्त्रक्रियेसाठी दिली ५० हजाराची मदतकायमस्वरुपी येणार जीवनात प्रकाश पोलीस व उद्योजकाचा पुढाकार

जळगाव : गेल्या २१ वर्षापासून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सफाईचे काम करणा-या श्याम राजू चव्हाण या तरुणाच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी एमआयडीसी पोलीस व स्पेक्ट्रम कंपनीचे दीपक चौधरी यांनी रविवारी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीच्या हातामुळे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या श्यामच्या जीवनात प्रकाश उजेडणार आहे.
श्याम हा २१ वर्षापासून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सफाईचे काम करतो. प्रत्येक अधिकाºयाचे दालन, पोलीस स्टेशन याची नित्याची सफाई, पाणी आणून देणे, चहा आणून देणे हे नित्याचे तो काम करतो. जन्मत: दोन्ही डोळ्यांनी अंध असतानाही तो परिस्थितीशी संघर्ष करीत आहे. त्याची जगण्याची व मुलांना शिक्षणाची जिद्द पाहता पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याला आपआपल्या परीने आर्थिक मदत करतात. त्यावर त्याचा घर संसार व मुलांचे शिक्षण होते. हे काम करीत असताना श्याम याने अधिकारी व कर्मचाºयांची मने जिंकली.
हैदराबादला होणार शस्त्रक्रिया
श्याम याला जीवनात कायमचा प्रकाश यावा यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, स्पेक्ट्रक कंपनीचे दीपक चौधरी, उपनिरीक्षक योगेश शिंदे, सहायक फौजदार अतुल वंजारी व आनंदसिंग पाटील यांनी ५० हजार रुपये गोळा करुन रविवारी श्यामला सुपूर्द केले. हैदराबाद येथील एल.बी.प्रसाद रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होणार आहे.

पूर्वी हॉटेलमध्ये होता वेटर
श्याम हा पूर्वी एका हॉटेलमध्ये वेटर होता. सहायक फौजदार रामकृष्ण पाटील १९९३ मध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना त्यांनी श्याम याला पोलीस ठाण्यात कामासाठी आणले होते. तेव्हा पाटील स्वत:च्या खिशातून श्याम याला दरमहा १५० रुपये महिना द्यायचे. १९९४ पासून श्याम आजतायगत कामाला कायम आहे.

Web Title: Both hands have a handful of fireworks with a blue-collared worker