लाचखोर मुख्याध्यापकासह दोघे अटकेत

By Admin | Updated: July 17, 2014 15:00 IST2014-07-17T15:00:08+5:302014-07-17T15:00:08+5:30

महाविद्यालयात तीन मुलींच्या प्रवेशासाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक आर.जे. बडगुजर व पर्यवेक्षक बी.यू. पानपाटील यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

Both the accused along with the bribe headmaster | लाचखोर मुख्याध्यापकासह दोघे अटकेत

लाचखोर मुख्याध्यापकासह दोघे अटकेत

बोदवड (जि.जळगाव) : शहरातील न.ह. रांका हायस्कूल व कनिष्ष्ठ महाविद्यालयात तीन मुलींच्या प्रवेशासाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक आर.जे. बडगुजर व पर्यवेक्षक बी.यू. पानपाटील यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. आज दुपारी ही घटना घडली.बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष प्रकाशचंद सुराणा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)

 ■ बुधवारी दुपारी बडगुजर व पानपाटील नऊ हजार रुपयांची लाच घेताना 'अँन्टीकरप्नश' च्या फासात अडकले. तेव्हा डी.डी. गवारे यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले.

■ प्रवेश शुल्क ४५८ रुपये असताना तीन हजार जादा देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. विनंती करूनही फायदा न झाल्याने 'अँन्टीकरप्शन'कडे तक्रार केली.

■ साळशिंगीचे विलास जगन्नाथ बिजागरे यांची मुलगी व तिच्या दोन मैत्रिणींना अकरावी कला शाखेत प्रवेश हवा होता. ते महाविद्यालयात आले असता मुलीच्या प्रवेशासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. 

 

Web Title: Both the accused along with the bribe headmaster