The bodies of two children, including a mother, were found in the well; Shocking incident in Jalgaon | विहिरीत आढळला आईसह दोन लेकरांचा मृतदेह; जळगावमधील धक्कादायक घटना

विहिरीत आढळला आईसह दोन लेकरांचा मृतदेह; जळगावमधील धक्कादायक घटना

भडगाव जि. जळगाव  :  एकाच विहिरीत आईसह दोन लेकरांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कनाशी शिवारात त्यांच्या स्वत:च्याच शेतात घडली.  गायत्री दिनेश पाटील ( ४३), तिचा मुलगा खुशवंत (१० ) मुलगी भैरवी ( ८ ) अशी या मृत आई व मुलांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार , गायत्री ही दोन्ही मुलांसह कनाशी शिवारात असलेल्या आपल्या शेतात गेली होती. सायंकाळी महिला व मुले घरी न परतल्याने शोधाशोध सुरु झाली.  त्यावेळी काही जण शेतात पोहचले असता त्यांना विहिरीत तीनही जणांचे  मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यांना लागलीच भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .

कनाशी येथील पोलीस पाटील अनिल सुरेश पाटील यांच्या खबरीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  रात्री ११:३० वा गायत्रीचे आई- वडिल व नातलग भडगाव येथे पोहचले. त्यांनी आपली मुलगी आणि नातूंचे मृतदेह पाहताच त्यांनी एकच टाहो फोडला.

Read in English

Web Title: The bodies of two children, including a mother, were found in the well; Shocking incident in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.