विहिरीत आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 23:07 IST2021-01-21T23:06:30+5:302021-01-21T23:07:14+5:30

सावखेडेसीम शिवारात शेतातील विहिरीत सावखेडासीम येथील अनिल धुडकू पाटील यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी आढळला. 

Bodies found in the well | विहिरीत आढळला मृतदेह

विहिरीत आढळला मृतदेह

ठळक मुद्देगेल्या दोन दिवसांपासून होते बेपत्ता.

लोकमत न्यूज नेटवर्क

यावल : तालुक्यातील दहिगाव येथून जवळच असलेल्या सावखेडेसीम शिवारात अजय दिलीप पाटील यांच्या शेतातील विहिरीत सावखेडासीम येथील अनिल धुडकू पाटील (वय ४५) यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी आढळला. 

याबाबतची खबर यावल पोलीस पोलीस पाटील यांनी दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल मेहमूद तडवी शेख असलम शेख करीत आहेत. ते गेल्या दोन दिवसांपासून घरात कोणाला न सांगता निघून गेले होते. त्यांचा शोध घेत असताना गुरुवारी शिवारातील अजय पाटील यांच्या शेतातील विहिरीच्या बाजूला त्यांच्या चपला व पाकीट निदर्शनास आले. यावरून त्यांचा मृतदेह या विहिरीत असावा, हा निकष लावण्यात  आला. 

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. ते पीक संरक्षण संस्थेचे माजी चेअरमन होते.

Web Title: Bodies found in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.