बोदवड बसस्थानकावरून मंगलपोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 19:28 IST2020-01-22T19:27:38+5:302020-01-22T19:28:19+5:30
येवती येथील महिलेची ३० हजार रुपये किमतीची मंगलपोत बोदवड बसस्थानकावरून लांबविली.

बोदवड बसस्थानकावरून मंगलपोत लांबविली
बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील येवती येथील महिलेची ३० हजार रुपये किमतीची मंगलपोत बोदवड बसस्थानकावरून लांबविली. ही घटना बुधवारी दुपारी बाराला घडली.
येवती येथील महिला देवकाबाई विठ्ठल जंगले ही पती विठ्ठल पांडुरंग जंगले यांच्यासोबत मलकापूर येथे जाण्यासाठी बोदवड बसस्थानकावर आली. ही महिला बसमध्ये चढताना गर्दी झाली. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यात असलेली दोन ग्रॅम पेंडल तसेच सोन्याचे ८० मणी असलेली ३० हजार रुपये किमतीची मंगलपोत लांबवली.
महिलेच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली कालीचरण बिºहाडे करीत आहे.
बोदवड बसस्थानकावर चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. यामुळे प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.